Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या भारतीय सेनेमध्ये 191 जागांसाठी भरती; पगार ५६ हजार रुपयापर्यंत

भारतीय सेनेमध्ये 191 जागांसाठी भरती; पगार ५६ हजार रुपयापर्यंत

0
228
जामखेड न्युज – – – – 
भारतीय सेनेमध्ये 191 जागांसाठी पदभरती निघाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SSC (Tech) आणि SSCW (Tech) या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१. SSC (Tech)
२. SSCW (Tech)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसंच शाहिद जवानांच्या पत्नींना या पदांसाठी अर्ज करायचं असेल तर त्यातही इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
वयो मर्यादा :
SSC (Tech) – 20 to 27 years as on 01 Apr 2022
SSCW (Tech) – जास्तीत जास्त 35 years of age as on 01 Apr 2022.
अशी होणार ट्रेनिंग
निवडलेल्या उमेदवारांना अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी चेन्नई इथे त्यांच्या गुणवत्तेच्या अंतिम क्रमानुसार आणि पात्रता निकषानुसार ट्रेनिंग देण्यात येईल. 49 आठवड्यांची ही ट्रेनिंग असणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना किंवा त्यांना/ तिला लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही
परीक्षा फी : फी नाही
वेतनश्रेणी :
-पुरुषांसाठी-56100 ते 1,77,500 रुपये (स्तर -10)
-महिलांसाठी-56100 ते 1,77,500 रुपये (स्तर -10)
-विधवेसाठी – 56100 ते 1,77,500 रुपये (स्तर -10)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज पाठववण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!