Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांचा वाढदिवस अनाथ निराधार मुलांच्या हस्ते केक कापून मुलांना मिष्ठान्न...

आमदार रोहित पवारांचा वाढदिवस अनाथ निराधार मुलांच्या हस्ते केक कापून मुलांना मिष्ठान्न भोजन देत साजरा

0
230
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड तालुक्यातील निवारा बालगृह येथे कर्जत – जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ, निराधार ,आत्महत्याग्रस्त, शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते बीड रोड वरील  हॉटेल विराज येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
      अनाथ ,निराधार, मुलांना वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते ॲड.हर्षल डोके व सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांनी जेवणाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना ॲड.हर्षल डोके म्हणाले, आपण जर हे खाणे अशा लोकांना दिले तर त्यांची भूक भागेल. आपण जो हा अवाढव्य खर्च करतो, तो न करता या लोकांना कपडे, पांघरुण दिले तर त्यांची ती गरज तरी पूर्ण होईल. याच ५०००/-ते १००००/- त्यांच्या कितीतरी गरजा आपण पूर्ण करू शकू. एखाद्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात, वगैरे ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांसाठी जर आपण हा खर्च केला तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा केव्हाही तुम्हाला मिळालेल्या भेटींपेक्षा, वाढदिवसाची मिळालेली अमूल्य भेट असेल.
याप्रसंगी विनायक राळेभात, महेश डोळस, विशाल पवार, फारुक शेख, अब्दुल खान, दिनेश जाधव, बंटी राळेभात, मिथुन जाधव निवारा बालगृहाचे अधिक्षक  वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!