सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार

0
193
जामखेड न्युज – – – 
मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे. असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, लवकर पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.
यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here