Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिंगवी चष्माघर व आनंदऋषीजी नेत्रालय नगर...

लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिंगवी चष्माघर व आनंदऋषीजी नेत्रालय नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

0
237

जामखेड प्रतिनिधी

                    जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

  लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय सुंदरबाई कन्हैयालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठानच्या प्रेरणेने शिंगवी चष्माघर जामखेड आनंदऋषीजी नेत्रालय नगर यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीरात सुमारे ११० रूग्णांनी नावनोंदणी केली होती. पण चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ४५ रूग्ण आले होते त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नगरला पाठवण्यात आले.
       शिंगवी चष्माघर जामखेड तर्फे १९८४ पासून म्हणजे ३७ वर्षापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते आतापर्यंत दोन लाख दहा हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे यातील नव्वद हजार रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील तसेच जामखेड, करमाळा, पाटोदा, आष्टी, भूम, परांडा सह अनेक तालुक्यातील रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.
   सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करून शिबीराचे आयोजन करण्यात येते येताना मास्क व सॅनिटायझर घेऊन येणे अशा सूचना दिल्या जातात.
शिबीरातील सुविधा पुढीलप्रमाणे असतात
मोफत शस्त्रक्रिया करून लेन्स अल्पदरात बसविण्यात येतात, शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची तपासणी नेत्रतज्ज्ञामार्फत केली जाते, शिबीरात मोफत औषधोपचार, काळा चष्मा, राहण्याची व जेवणाची सोय मोफत असते, जामखेड ते नगर येण्या जाण्याची मोफत सोय असते.
     यावेळी जामखेड न्युजशी बोलताना अशोक शिंगवी म्हणाले की, गेल्या ३७ वर्षापासून आम्ही गोरगरीब रूग्णांना दृष्टी देण्याचे काम करत आहेत. आम्ही कोणतेही शासकीय अनुदान घेत नाही. आतापर्यंत नव्वद हजार रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. दर सव्वा महिन्याला आम्ही हे शिबीर आयोजित करतोत. सर्व शस्त्रक्रिया आतापर्यंत यशस्वी झालेल्या आहेत.
यावेळी शिंगवी चष्माघरचे संचालक अशोक शिंगवी व अभय शिंगवी यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, खजिनदार सुदाम वराट तसेच जामखेड पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख व नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल धनराज पवार यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!