आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्याला मिळणार दोन लीटर पेट्रोल किंवा डिझेल – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

0
183
जामखेड  प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – –  (सुदाम वराट) 
      जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली व जामखेडच्या कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आ रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक रक्तदात्याला दोन लिटर पेट्रोल किंवा डिझेल देण्यात येणार असल्याची  माहिती कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी दिली.
      या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि.२९) सकाळी नऊ वाजता  मा आमदार रोहित दादा पवार यांचे वडील राजेंद्र पवार  चेअरमन बारामती ॲग्रो डेव्हलपमेंट यांच्या हस्ते होणार आहे.  प्रमुख पाहुणे म्हणून  तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकिय अधीक्षक डॉ संजय वाघ , पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड ,  मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते  हे उपस्थित राहणार आहेत.
    रक्तदात्यास दोन लिटर पेट्रोल किंवा दोन लिटर डिझेल देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या युवकांना येण्याजाण्यास स्वतःचा खर्च होऊ नये म्हणून पेट्रोल देण्याची संकल्पना असल्याचे  प्रफुल्ल सोळंकी यांनी सांगितले.
      कोठारी प्रतिष्ठान मार्फत २५ वेळा रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचे प्राण वाचवले आहेत . सध्या  कोरोना काळामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. प्रत्येकाने रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचण्याचा प्रयत्न करावा.
     याकामी रक्तदात्यांनी नाव नोंदणी
या कार्यक्रमाचे संयोजक
संजय कोठारी ( ९४२०८००९८१ ) व प्रफुल्ल सोळंकी ( ८०८७७०००७० ) यांच्याकडे करावी. असे आवाहण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here