लाडके आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावळेश्वर उद्योग समूहाच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
238

जामखेड प्रतिनिधी

               जामखेड न्युज – – (सुदाम वराट)

महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावळेश्वर उद्योग समूहाच्या वतीने रमेश (दादा) आजबे यांनी बुधवार दि. २९ रोजी जामखेड येथे भव्य एकदिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
    सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश (दादा) आजबे यांनी प्रथम क्रमांकास एकवीस हजार रुपयांचे तर व्दितीय क्रमांकास अकरा हजार रुपयांचे पारितोषिक ठेवलेले आहे. शिस्तबद्ध संघास साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांच्यातर्फे पाच हजार एक रूपयांचे तर उत्कृष्ट फलंदाजास पिंपळगाव उंडाचे सरपंच गणेश जगताप तर्फे दोन हजार शंभर रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक रमेश (दादा) आजबे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
   स्पर्धेचे ठिकाण शंभुराजे क्रिकेट मैदान सुराणा पेट्रोल पंपाशेजारी बीड रोड जामखेड येथे आहे. स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. संघाची नावनोंदणी आवश्यक आहे. प्रवेश फी आॅनलाईन स्विकारली जाईल, थ्रो (फेकी) गोलंदाजी टाकू दिली जाणार नाही,स्पर्धेचा प्रत्येक सामना आयोजकांच्या नियमानुसार खेळवला जाईल, पंचाचा निर्णय अंतिम राहिल, गैरवर्तन करणार्‍या संघास बाद केले जाईल, खेळाडूंना काही इजा झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत,खेळाडूंचे आधार कार्ड आवश्यक आहे.
    स्पर्धेसाठी प्रवेश फी १५०० रूपये राहिल
संयोजक – विशाल बाबर, इम्रान सर व बापू काटकर असतील तर संघाना संपर्कासाठी विशाल बाबर 8605718181 तर इम्रान सर 9226781283 यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन आयोजक रमेश (दादा) आजबे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here