केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका

0
221
जामखेड न्युज – – – 
     मागील आठवडय़ात साडेदहा ते अकरा हजार रुपये असणारा सोयाबीनचा दर आता पाच ते सहा हजार रुपये झाला आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिल्याने व सोयाबीन वरील आयात शुल्क कमी केल्याने दर पडले आहेत.
 देशातील हंगामी महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दरम्यान मागील आठवड्यात सोयाबीनची आयात केल्याने व सोयाबीनची आवक वाढल्याने सध्या दर पडले आहेत
सोयबीन काढण्याचा हंगाम सुरू असताना आयात शुल्क कमी केला आहे. त्यामुळे हे दर पडल्याने केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिळून सोशल मीडीयावर ट्रेंड सूरू केला आहे. याला हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद आहेत.
मागच्या चार दिवसांपूर्वी १० हजार ते ११ हजार रुपये प्रती क्विंटल सोयाबीनचा दर होता. काल त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल ५५०० ते ५७०० दर झाला आहे. तब्बल ४० ते ५० % दर पडले आहेत. मागील आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन केंद्र सरकारने आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला. त्यातच खाद्यतेल आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात करण्यात आली. या कारणांमुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here