जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
जामखेड तालुका वंचीत बहुजन आघाडी, तसेच ग्रामीण विकास केंद्र जामखेड च्या वतीने नवनियुक्त तहसीलदार योगेश चंद्रे यांचा वंचीत बहुजन आघाडीचे राज्याचे नेते अँड.डॉ. अरुण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अँड.जाधव यांनी आपल्या मनोगतात वंचितांच्या हक्कांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने व प्रशासन या नात्याने आपण सोबत काम करूया, व ज्या वंचीत घटकांना आवाज नाही त्या वंचीत घटकांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सोडवूया असे मत अँड. जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामीण विकास केंद्राचे संचाल बापू ओहोळ यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण विकास केंद्र ही संस्था तालुक्यातील मोहा फाटा या ठिकाणी निवारा बालगृह नावाचा प्रकल्प चालवते या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील 65 मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून ,या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. हा प्रकल्प जामखेडच्या वैभवात भर टाकणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. माणसाचा उत्साह वाढवणारा प्रकल्प आहे. आपण या प्रकल्पाला भेट देऊन संस्थेचे काम बघावे असे ते म्हणाले.
यावेळी नवनियुक्त तहसीलदार श्री. चंद्रे यांनी आपल्या मनोगतात जामखेड तालुक्यातील वंचीत घटकांसाठी, प्राधान्यतेने व्यापक काम करू अस मत त्यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना तहसीलदार श्री. चंद्रे बोलत होते. श्री. चंद्रे म्हणाले, समाजातील जागृत नागरिकांनी दबलेल्या लोकांचा कुठतरी आवाज बनून हा आवाज शासन दरबारी मांडून एक सकारात्मक वाटचाल करण्याकडे एक महत्वाची भूमिका निभवावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे संचालक किशोरजी आखाडे, वंचीत बहुजन आघाडीचे जामखेड ता.अध्यक्ष अतिष पारवे, कर्जत ता.अध्यक्ष सोमनाथ भैलुमे, नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष अजिनाथ शिंदे, विशाल पवार, विशाल जाधव, सागर भांगरे, सचिन भिंगारदिवे, संजय खरात, अनिल घोगरदरे , नंदकुमार गाडे सर, विक्रम समुद्र, राजू शिंदे, महादेव भैलुमे, लक्षमन शिंदे, अरविंद वाघमारे, परशुराम शिंदे, रामभाऊ बाबर, महेश जाधव, अनिकेत सदाफुले, दीपक माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.