महाराष्ट्रातील ही आहेत प्रसिध्द प्रमुख पर्यटन ठिकाणे

0
377
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
     भारतातील प्रमुख राज्यामध्ये महाराष्ट्र  राज्याची वेगळी ओळख असून महाराष्ट्राला मोठा इतिहास देखील लाभलेला आहे. डोंगरदऱ्या, विविध मंदिर, वास्तु, धार्मिक स्थळे, समुद्र किनारे अशी विशिष्ट भौगोलीक रचना महाराष्ट्राला लाभली आहे. चला तर जाणून घेवू महाराष्ट्रातील पर्यटनासाठी प्रमुख असलेल्या ठिकाणांची माहिती.
मुंबईमुंबई शहर हे स्वन्नांचे तसेच कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असून ही महाराष्ट्राची राजधानी आहे. येथे विविध खाण्याची दुकाने, अदभूत वास्तुकला आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. सुट्टी घालविण्यासाठी विविध मनोरज ठिकाणांनी भरलेले ठिकाणे आहेत. तसेच प्रसिध्द मंदिर, चर्च, मस्जिद अशा धार्मीक स्थळांना देखील भेट देण्यासारखे सुंदर ठिकाणे आहेत.
पुणेपुणे हे देखील महाराष्ट्रातील महत्वांच्या शहरापैकी एक शहर असून येथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहे. म्हणून पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून देखील ओळखले जाते. तसेच पुण्यात आगा खान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, शनिवार वाडा, पार्वती हिल, डेव्हिड सिनेगॉग असे अनेक ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.
नागपूरनागपूर हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते. येथे स्वादिष्ट रसाळ संत्री आणि असंख्य व्याघ्र उद्यान, स्वच्छ व सुटसूटीत शहर व इतर सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. नागपुरात भेट देण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत यात मुख्य दीक्षाभूमी स्थळ आहे. तसेच सीताबुल्डी किल्ला, फुटाळा तलाव, महाराज बाग प्राणीसंग्रहालय, गोरेवाडा तलाव, श्री पोद्दारेश्वर राम मंदिर आदी ठिकाणे आहेत.
महाबळेश्वरपश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महाबळेश्वर हे एक नयनरम्य हिल स्टेशन महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द हिल स्टेशन आहे. बाराही महिने या हिलस्टेशनला पर्यटकांची गर्दी असते. मुंबईजवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. ब्रिटीश युगात ही उन्हाळी राजधानी होती आणि स्ट्रॉबेरी, तुती, गुसबेरी, रास्पबेरी हे रसाळ फळे, तसेच विविध पदार्थ, पेये यासारख्या बेरीच्या मोठ्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरमध्ये विल्सन पॉईंट, अल्बर्ट सीट, केट्स पॉईंट आणि लॉडविक पॉईंट, एलिफंटा पाईंट सारखे असंख्य फिरण्याचे ठिकाण आहे.
नाशिक नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शहर असून या शहराची आता वेगळी ओळख ‘वाइन कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी देखील तयार झाली आहे. नाशिक हिंदु तीर्थक्षेत्रे, सुंदर द्राक्ष बागे, ऐतिहासिक स्थळे, धबधबे आणि बरेच काही ठिकाणे येथे आहे. येथे कुंभमेळा देखील होत असून नाशिक जवळ पर्यटनासाठी असलेल्या ठिकाणांपैकी हरिहर किल्ला, दुगरवाडी धबधबा, रामसेज किल्ला, पांडवलेणी लेणी, सीता गुफा, धर्मचक्र जैन मंदिर हे प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
सातारामहाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थळांमध्ये सातार शहर असून कृष्णा नदी आणि वेण्णा नदीच्या संगमावर हे वसलेले आहे. सातारा हे सात किल्ल्यांच्या नावावर आहे जे या शहरात आहेत आणि तोसेघर धबधबा, लिंगमला धबधबा, अजिंक्यतारा किल्ला, नटराज मंदिर, मायाणी पक्षी अभयारण्य, कास पठार, प्रतापगड किल्ला, शिवसागर तलाव, कास तलाव, कोयनानगर धरण असे अनेक पर्यटकांसाठी नंदनवन असलेला सातारा आहे.
पाचगणीमुंबई जवळ अनेक हिल स्टेशन असून यात पाचगणी एक सुंदर हिल स्टेशन आहे. आजूबाजुला असलेला पाच टेकड्यांच्या नावावर पाचगणी हे नाव पडले असून ब्रिटिशांसाठी उन्हाळ्यातील हे आवडीचे ठिकाण होते. पर्यटकांना मन प्रफुल्लीत करणारे हे हिल स्टेशन असून येथे प्रसन्न, हिरवळ आणि शांतता येथे मिळते.
कोल्हापूर कोल्हापूर शहराला समृद्ध वारसा आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. कोल्हापूर हे मसाले, दागिने, साड्या आणि कोल्हापुरी पादत्राणांसाठीही प्रसिद्ध आहे. हे शहर मंदिरे, तलाव, किल्ले, वन्यजीव अभयारण्य आणि संग्रहालयांसाठी ओळखले जाते. यात महालक्ष्मी मंदिर, श्री छत्रपती शाहू संग्रहालय, ज्योतिबा मंदिर, रंकाळा तलाव, सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय हे प्रसिध्द ठिकाण पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र आहे.
औरंगाबादऔरंगाबाद शहर पयर्टकांच्या आवडीच्या ठिकाणापैंकी एक आहे. या शहराला मुघलकालीन वास्तू, लेणी, उद्याने, तलाव आणि वाड्यांचा वारसा लाभला आहे. या शहराला अनेक गेट असून मुघल सम्राट औरंगजेबाचे नाव या शहराला मिळाले आहे. औरंगाबाद, बीबी का मकबरा, हिमायत बाग, सोनेरी महल, शिवाजी महाराज संग्रहालय आणि इतर मनोरंजक स्थळे पाहण्यासाठी विविध ठिकाणांपैकी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here