जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज ( सुदाम वराट)
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय च्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व कोरोना संसर्गामुळे दिड वर्षा पासून शाळा बंद असल्याने शिक्षक-शाळा आपल्या दारी या उपक्रमाचे नियोजन प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांनी विविध गाव-वाडी-वस्ती-गल्ली ठिकाणी संपर्क करून उपक्रम यशस्वी केला. विद्यार्थ्यांचे गाव ,वाडी, वस्ती, गल्ली नुसार गट याद्या करून शिक्षकांचे नियोजन केले . शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संपर्क करून गट नुसार कोविड चे नियम पळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी व अभ्यासा संदर्भात मार्गदर्शन केले तसेच पालक भेट घेऊन मार्गदर्शन केले.
पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करून यामधून आमच्या पाल्याचे सर्वांगीण विकास होईल असे मत व्यक्त केले . शाळा बंद असतानाही शिक्षक शाळा आमच्या दारी आल्यामुळे विद्यार्थी व पालक आनंदित होते.उपमुख्याध्यापक श्री तांबे पी एन, पर्यवेक्षक श्री साळवे डी एन गट नुसार नियोजन रत्नापूर – श्री साळुंके बी .एस,श्री सांगळे ए एम,जांबवाडी- माने वस्ती- शेळके वस्ती- श्री. हजारे एस.आर.,श्री देशमुख एस. एस.,धोत्री- सावरगाव -अनारसे सर, लटपटे सर,कुसडगाव – ढाळे डी एन , गाडे पी एस,श्री मोहळकर आर बी.,रत्नापूर-श्री सोळुंके बी एस,श्री सांगळे इ एम ,भूतवडा रोड-शिक्षक कॉलनी-दत्तनगर-श्री. कोकाटे पी. ए.,श्री. बाबर जी. ए,श्री. लबडे सर.,चुंबळी- आजबे वस्ती- श्री. ससाणे एस.आर,श्री. गर्जे एस. व्ही., श्री. पवार एस. एस., झिक्री-धोंडपारगाव-खांडवी- बोर्ले- नान्नज:-श्री. ससाणे एस.आर,श्री. गर्जे एस. व्ही. ,श्री. पवार एस. एस.,छ श्री शिवाजी नगर-मोरेवस्ती श्री भोसले एम के,श्री शिंदे बी एस,तपनेश्वर गल्ली- महादेव मंदिर-श्रीम आंधळे मॅडम,श्रीम शेकडे मॅडम,श्रीम पालकर मॅडम,श्रीम गोपाळघरे मॅडम,बाजार तळ,नूराणी कॉलनी -श्री.इंगळे एस.एम., श्री. शेटे डी. ए.,आरोळे वस्ती-करमाळा रोड-रणदिवे एस आर , केंद्रे ए एच, मिलिंद नगर -सौ शिंदे मॅडम ,श्रीम शिनगारे मॅडम यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संपर्क करून गाव ,वाडी,वस्ती, गल्ली जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी,ऑनलाईन ,रयतचा रोज प्रकल्प,शासनाचा सेतू अभ्यासक्रम, स्वाध्याय ,चाचणी, गृहपाठ या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पालकांनी मेसेज ,फोन व करून शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे. रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्री. तुकाराम कण्हेरकर साहेब, सहायक विभागीय अधिकारी श्री.वाळुंजकर साहेब व श्री.तापकीर साहेब , स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य श्री हरिभाऊ बेलेकर,रा.कॉ. महाराष्ट्र सरचिटणीस श्री राजेंद्रजी कोठार,शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, शाळा विकास व व्यवस्थापन समिती यांच्यावतीने शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.






