Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्याचे एका महिन्यात समृद्धी बजेट तयार करणार – गटविकास अधिकारी प्रकाश...

जामखेड तालुक्याचे एका महिन्यात समृद्धी बजेट तयार करणार – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ रोजगार हमीच्या माध्यमातून कुटुंबे लखोपती करणार – जैतादेही पॅटर्न प्रभावीपणे राबविणार

0
327
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
            जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पदभार स्वीकारताच तालुका समृद्ध करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कुटुंबे लखोपती करणे, गावे समृद्ध करून स्वच्छ सुंदर करण्याचे ध्येय ठेवून कामाला सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्रात आदर्श ठरलेला जैतादेही पॅटर्न तालुक्यात प्रभावी राबविण्यात येणार आहे.
          चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम करताना पोळ यांनी नरेगाचे प्रभावी काम करून गावे समृद्ध बनवली त्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील गटविकास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली होती. धुळे, नगर, नाशिक व नंदुरबार येथिल गटविकास अधिकाऱ्यांना तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  जैतादेही पॅटर्न प्रभावी राबविणार
चिखलदरा तालुक्यातील जैतादेही या गावात नरेगाचे उत्तम कामे केल्याने संपुर्ण राज्यात जैतादेही पॅटर्न प्रसिद्ध झाला यामधे नरेगा अंतर्गत शाळा, अंगणवाडीत संरक्षक भिंत, वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, जैविक खते, शोषखड्डा, परिसरातील रस्ते अशी कामे करून स्वच्छ व सुंदर शाळा करणे शाळा परिसरात स्वच्छ सुंदर झाला की त्या भागाचा विकास होतो हाच पॅटर्न जामखेड तालुक्यात प्रभावी राबविण्यात येणार आहे.
     गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, सरपंच यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले आहे.
      जामखेड न्युजशी बोलताना पोळ यांनी सांगितले की, मी चिखलदरा येथे गटविकास अधिकारी आसताना रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कुटुंबे समृद्ध केली रोजगार हमीच्या माध्यमातून कुटुंबे लखोपती करणे व जैतादेही पॅटर्न प्रभावीपणे राबविणार आहे. आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामसेवक, सरपंच राजकीय पदाधिकारी, पत्रकार यांच्या सहकार्याने जामखेड तालुका रोजगार हमीच्या माध्यमातून विकास करून प्रथम क्रमांकावर आणणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!