Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या प्राचार्य विकी घायतडक यांचा आदर्श अभियंता म्हणून रेणुकामाता मल्टिस्टेटच्या वतीने सन्मान

प्राचार्य विकी घायतडक यांचा आदर्श अभियंता म्हणून रेणुकामाता मल्टिस्टेटच्या वतीने सन्मान

0
290
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
येथील डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काॅलेजचे प्रिन्सिपॉल प्राचार्य विकी घायतडक यांचा आदर्श अभियंता म्हणून रेणुकामाता मल्टिस्टेटच्या वतीने मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मान करण्यात आला.
       जामखेड येथील दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे दि.१५ सप्टेंबर हा दिवस इंजिनिअर मोक्षगंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी  प्रिन्सिपॉल. प्रा. विकी घायतडक, सर्व शिक्षक, अभियंता यांना रेणुकामाता मल्टिस्टेटचे बँक मॅनेजर यांच्यावतीने  सॅनिटायझर व मास्कचे किट देऊन सन्मान करण्यात आला.
   यावेळी शाखाधिकारी छत्रुगण वराट व राजकुमार देशमुख यांनी प्रा.रणजित भालशंकर, प्रा.किशोर हुंबे, प्रा.सागर गांधी, कु.पूजा पाटील, संतोष  जगताप सर, प्रतीक उदारे, विक्रम कुटे, अधीक्षक संतोष डहाळे, सविता सुतार यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  इंजिनिअर मोक्षगंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रिन्सिपॉल प्रा.विकी घायतडक यांनी मोक्षगंडम विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट सांगितला. तसेच समाजामध्ये बदल घडवायचे असतील तर सोसिअल इंजिनिअरिंगचा प्रयोग करणे गरजेचे आहे. समाजाला घडवायचे असेल तर शिक्षणा बरोबरच चांगल्या विचारांची व संस्काराची जोड असणे गरजेचे आहे. असेही मत प्रा. विकी घायतडक यांनी व्यक्त केली. आदर्श अभियंता म्हणून सन्मान केल्याबद्दल प्राचार्य विकी घायतडक यांनी श्री रेणुकामाता मल्टिस्टेट व मॅनेजर छत्रुगण वराट तसेच राजकुमार देशमुख यांचे आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुणे ता.पाटोदा विस्तार अधिकारी सुळे साहेब तसेच दीपक सदाफुले इ.मान्यवर उपस्थित होते. तसेच दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्राचार्य व सर्व अभियंता शिक्षकांचे मा.उपाध्यक्ष अरुनशेठ चिंतामणी व सेक्रेटरी मा.शशिकांत देशमुख यांनी स्वागत केले अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!