जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव शंभर टक्के भरला – तालुक्यातील बाकी तलावात फक्त २५ ते ३० टक्केच पाणीसाठा

0
598
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
           घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव शंभर टक्के भरला असुन सांडवा ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील फक्त भुतवडा तलावच भरला आहे. बाकी तलावातील पाणीसाठा २५ ते ३० टक्केच आहे. घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे भुतवडा तलाव शंभर टक्के भरला आहे अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता रामभाऊ ढेपे यांनी दिली.
    भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट आहे तर जोडतलावाची पाणी साठवणूक ५६ दशलक्ष घनफूट आहे जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दि. ४ रोजी दुपारी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झाला तो रात्रभर सुरू होता त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ रामेश्वर धबधब्याच्या वरती असलेला भुरेवाडी तलाव भरला आहे. रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. मोठी धार पडत आहे. पण सध्या कोरोना महामारीमुळे पर्यटकाला तेथे जाण्यासाठी बंदी आहे. भुरेवाडी तलाव भरून रात्रीतच भुतवडा तलाव १०० टक्के भरला आहे. व मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे खाली असलेल्या रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे.
       चौकट
     भुतवडा तलावातून जामखेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. विना लाईटचा संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत असतो पण आता शहराची लोकसंख्या पाहता भुतवडा तलावातील पाणी शहराला पुरत नाही त्यामुळे गेल्या वर्षापासून जामखेड शहरात आठ दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळत आहे. शहर वाशियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून उजणी धरणातून १३९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे सहा महिन्यात काम पुर्ण होईल
 चौकट
घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील एकमेव भुतवडा तलाव शंभर टक्के भरला आहे बाकी तलावात २५ ते ३० टक्केच पाणी साठा आहे. भुतवडा तलावातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने लवकरात लवकर रत्नापूर तलाव शंभर टक्के भरेल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here