जामखेड न्युज – – –
“राज्यात सर्वत्र मंदिरं बंद आहेत, मात्र कोरोनाकाळात खरे देव कोण हे आपण पाहिलं आहे. हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील नायर रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इतकंच नाही तर या रुग्णालयाला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या निमित्ताने नायर हॉस्पिटलला 100 कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मी फक्त कौतुक करु शकतो. शुभेच्छा देऊ शकतो. अभिनंदन करु शकतो. मात्र या संस्थेचा प्रवास सांगणारी जी एक शॉर्टफिल्म दाखवली ती थक्क करणारी आहे. सुरुवात कशी झाली. एखादी गोष्ट टिकवणं खूप गरजेचं असतं. संस्थेने त्या प्रतिकूल काळात काम सुरु ठेवलं. पारतंत्र्याचं 25 वर्षे, जिद्द काय असू शकतं हे त्याचं अप्रतिम उदाहण आहे.
जिद्द असेल तर काही नसलं तरी करता येऊ शकतं हे या संस्थेने दाखवलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. मी मागे म्हटलं होतं. मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं. व्यथा घेऊन जसं मंदिरात जातो तसं कुणीतरी दुर्दर आजाराने त्रस्त होऊन अनेकजण इथे येतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण बरे होऊन हसतखेळत जातात. त्यामुळे तुमच्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो.