जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आपल्या परिवाराचे गुन्हेगारी व कोरोनापासून रक्षण करण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी पोलीस सुचनांचे पालन करावे. असे आवाहन निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.
या निर्णयानुसार १) नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान दागीने व पैसे घरात न ठेवता सुरक्षीत ठिकाणी किंवा लॉकरमध्ये ठेवावेत, व आपण बाहेरगावी जात असल्यानची माहिती आजुबाजुचे लोकांना द्यावी. २) शहराचे बाहेरील भागात राहणाऱ्या लोकांनी आपला whatsapp ग्रुप तयार करावा व काही संशयास्पद असल्यास त्वरीत एकमेकांना कळवावे व पोलीसांनाही याची माहीती द्यावी. ३)सकाळी आपल्या भागात भंगार, कचरा, गोळा करणारे फिरत असल्यास फोटो काढुन ठेवावेत. ४) महीला सुध्दा रेखी (पाळत) करतात. काही विक्रीचा करण्याचा बहाणा करुन घर पाहतात, दुपारी ही भटकतात. अशा महिलांपासूनही सावध राहावे. ५) चादर, साडी, ईतर वस्तु विकणाऱ्यांपासुन सावध रहावे. ६) सोने चमकवणारे, एखादी स्किम सांगणारे, घरकुल बाबत माहीती, पैसे पुरवीतो सांगणाऱ्या भामट्यांपासुन सावध रहावे व त्यांची खात्री करावी. ७).mobile संबंधाने friend ship करणारे, लॉटरी लागल्याची माहीती देणारे, मिल्ट्रीमध्ये आहे सांगुन कार विक्री करणारे, OTP, ई. दस्तऐवज मांगणारे व्यक्तीपासून सावध रहावे. ८) काही लोक आपली बदनामी करतो, आपल्याला expose करतो, आपली सोशल मिडीयावर बदनामी करतो, अश्या धमक्या देणाऱ्या भामट्यांना मुळीच घाबरू नका. ९ ) तोतया पोलीस किंवा पोलीसांची भिती, ओळख दाखवीत असेल अश्या व्यक्तींनाही दाद देवु नका. १०) शहरात काही लोक स्वत:ला दादा, गँगस्टर असल्याचे भासवीतात यांना मुळीच घाबरु नका, त्यांचे विरुध्द बोलण्यास पुढे या, तसेच यांचे पालनकर्ते कोण आहेत याचीही माहीती पोलीसांना द्या. जेणेकरुन पोलीसांना त्यांचेवर कायदेशीर कारवाई करता येईल.
११) येणाऱ्या सण/उत्सवात आपण शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व आदेशाचे पालन करा, आपणास वेळोवेळी देण्यात येणाऱ्या माहीतीची दखल घ्या. १२) कोरोना बाबत सतर्क रहा व नियमांचे पालन करा.१३) शहरातील Traffic सुधारण्यास आपण स्वतः पासुन सुरवात करा, रोडवर गाडी लावणार नाही, वाहन व्यवस्थित पार्किंग करेल, रोडला अडथळा करणार नाही. असे स्वतःच आपले नियम बनवा १४) प्रदुषण मुक्त शहर , पर्यावरणाचे नुकसान करणार नाही, plaster of Paris ची मुर्ती पर्यावरणाला हानिकारक आहे .ई. बाबत जनजागृती करावी. १५) आपल्या मुलांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालकांनी अत्यंत सावध राहून त्यांचेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. १६) आपल्याला कोणत्याही व्यक्ती कडून धमकी किंवा काही त्रास होत असल्यास न घाबरता पोलीस स्टेशन जामखेड येथे तक्रार दयावी. पोलीस तुमच्या मदतीला सदैव तत्पर असतात.
अशा प्रकारे विविध नियमांच्या आधारे आपण आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. तरी नागरिकांनी हे नियम पाळावेत असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.









