जामखेड-कर्जत रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा तीव्र अंदोलन करणार : ॲड. अरुण जाधव

0
330
जामखेड प्रतिनिधी 
      जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
 मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा रस्ता असून पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व गोवा या राज्याकडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावरून मोठी वाहतूक आहे. तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघातील जामखेड, आरणगाव, माही-जळगाव, कर्जत, राशिन, बारामती, सातारा, फलटण मार्गे कोल्हापूर, तसेच पुणे, मुंबई व गोवा अशा विविध ठिकाणी जाण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वाहनांची या रस्त्यावरून मोठी वाहतूक आहे.
 हा रस्ता प्रचंड खराब झाला असून रस्त्यात खड्डे कि खड्डात रस्ता आहे हे समजत नाही. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे, खचलेल्या साईटपट्या, तसेच पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही.
  तो रस्ता ताबडतोब दुरून करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा अॅड अरूण जाधव यानी दिला
यामुळे वाहन धारकांना ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.  हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनलेला आहे. रस्त्यांमुळे अपघात तर होतच आहेत. याबरोबरच आजारी रूग्ण, गरोदर महिलांनाही दवाखान्यात जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर वाहन धारकांमध्ये मनक्याचे आजारही वाढू लागले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थामुळे वाहन धारकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून जात असताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य निमंत्रक ॲड. डॉ. अरुण जाधव हे या रस्त्यावरून जात असताना आरणगाव येथे थांबून रस्त्याची दुरावस्था पाहीली. व सोशल मीडीयाच्या माध्यमातून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी जाधव म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून अनेक आमदार – खासदार होऊन गेले मात्र या रस्त्याबाबत सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे दिसते.
ते वेगवेगळ्या पध्दतीने सांगत आहेत की या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र हा रस्ता नवीन होताना किंवा त्याची केली दुरूस्ती होताना दिसत नाही.
यामुळे आपल्या तिव्र भावना व्यक्त करतांना १५ दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरणगाव येथे खड्ड्यांची पुजा अंदोलन करण्याचा इशारा ॲड. अरुण जाधव यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here