Tuesday, October 20, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड अतिक्रमणाचा उद्या फैसला! बीड रोडवर दुकानातच वीजेचा पोल निघाल्याने अतिक्रमण करणाऱ्या...

जामखेड अतिक्रमणाचा उद्या फैसला! बीड रोडवर दुकानातच वीजेचा पोल निघाल्याने अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पितळ उघडे वहिवाट की गटहद्द, नेमकी मोजणी कोणती? व्यापाऱ्यांसह नागरिकांचे उद्याच्या निकालाकडे लक्ष

0
2
जामखेड अतिक्रमणाचा उद्या फैसला! बीड रोडवर दुकानातच वीजेचा पोल निघाल्याने अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पितळ उघडे  वहिवाट की गटहद्द, नेमकी मोजणी कोणती? व्यापाऱ्यांसह नागरिकांचे उद्याच्या निकालाकडे लक्ष

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड अतिक्रमणाचा उद्या फैसला! बीड रोडवर दुकानातच वीजेचा पोल निघाल्याने अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पितळ उघडे

वहिवाट की गटहद्द, नेमकी मोजणी कोणती? व्यापाऱ्यांसह नागरिकांचे उद्याच्या निकालाकडे लक्ष

 

जामखेड शहरातील बीड रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अतिक्रमण निश्चित करताना वहिवाटीनुसार मोजणी करायची की गटाच्या हद्दीनुसार, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच एका दुकानाच्या हद्दीत वीज वितरण कंपनीचा खांब आढळून आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे बीड रोडवरील अतिक्रमणाची नेमकी हद्द कोणती, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी मागील आठवडय़ात टंचाई आढावा बैठकीत व्यापाऱ्यांची एक इंचही बांधकाम पाडू देणार नाही असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते आता उद्या काय निकाल लागतो यावर सर्व काही अवलंबून आहे.

दुकानात वीज खांब; अतिक्रमणाच्या मोजणीवर प्रश्नचिन्ह!
बीड रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या विषयात रस्त्याची हद्द निश्चित करणे हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. एका दुकानाच्या जागेत वीज वितरण कंपनीचा खांब निघाल्याने प्रत्यक्ष जागेची मांडणी, रस्त्याची हद्द आणि अतिक्रमण निश्चित करण्याच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

वीज खांब दुकानाच्या हद्दीत आढळणे म्हणजे संबंधित जागा अतिक्रमणमुक्त आहे किंवा अतिक्रमण झालेले नाही, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी अधिकृत भूमिअभिलेख, रस्त्याची मंजूर हद्द आणि प्रत्यक्ष मोजणी यांची पडताळणी आवश्यक आहे.

वहिवाटीनुसार की गटहद्दीनुसार? हाच कळीचा प्रश्न!
अतिक्रमण निश्चित करताना अनेक वर्षांपासून सुरू असलेली वहिवाट ग्राह्य धरायची की अधिकृत गटहद्द आणि रस्त्याच्या हद्दीच्या नोंदींनुसार मोजणी करायची, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.
विशेषतः राष्ट्रीय महामार्गाच्या आरओडब्ल्यू (Right of Way) अर्थात रस्त्याच्या हक्काच्या क्षेत्रात कोणते बांधकाम किंवा दुकान येते, हे निश्चित करण्यासाठी अधिकृत अभिलेख आणि तांत्रिक मोजणी निर्णायक ठरू शकते.

व्यापाऱ्यांच्या जागा, दुकानांची प्रत्यक्ष स्थिती, रस्त्याची हद्द आणि अतिक्रमणाची व्याप्ती याबाबत स्पष्टता येण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिकृत मोजणी व नोंदींच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक आहे.

उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष!
बीड रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत असून, आता उद्या होणाऱ्या निकालाकडे व्यापारी, नागरिक आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष लागले आहे. या निकालातून अतिक्रमणाच्या हद्दीबाबत कोणती भूमिका स्पष्ट होते, तसेच पुढील कारवाईची दिशा काय ठरते, याबाबत उत्सुकता आहे.

वहिवाट, गटहद्द आणि आरओडब्ल्यूच्या सीमारेषेवरून सुरू असलेल्या या चर्चेला उद्या कोणते वळण मिळणार? बीड रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न नेमका कसा सुटणार, याचे उत्तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!