वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयासमोर जागरण गोंधळ

0
214
जामखेड प्रतिनिधी
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड शहरात महिलासाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात यावी, शहरातील साचलेले पाणी, रस्त्याची दुरवस्था अशा विविध मागण्यांसाठी वंचीत बहुजन आघाडीचे नेते अॅड. डॉ. अरुण जाधव व सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसील कार्यालयवर भरदिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
  जामखेड तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्ग जामखेड हद्द ते सौताडा घाट दुरुस्त करण्यात यावा. जामखेड शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालये बांधण्यात यावी; तसेच शहरात साचलेले पाणी, रस्त्यांची दुरावस्था, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न यामुळे चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन, यासारख्या आजारांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा या आंदोलनासाठीसाठी करण्यात आलेल्या अंदोलनासाठी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले व उपाध्यक्ष मोहन गडदे (मामा) यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये भैय्या फरांदे, कृष्णा घरटकर संदीप घरटकर, अण्णा शिंदे, अजिनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, मोहन शिंदे, सागर भांगरे, राजू शिंदे बाबा शेगर आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर मागण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here