Thursday, September 17, 2026
Home ताज्या बातम्या “वुशूच्या मैदानात जामखेडचा डंका! होशिंग विद्यालयाच्या खेळाडूंची पदकांची लयलूट, ६ खेळाडू विभागीय...

“वुशूच्या मैदानात जामखेडचा डंका! होशिंग विद्यालयाच्या खेळाडूंची पदकांची लयलूट, ६ खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र”

0
2
“वुशूच्या मैदानात जामखेडचा डंका! होशिंग विद्यालयाच्या खेळाडूंची पदकांची लयलूट, ६ खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र”

जामखेड न्युज – – – – – 

“वुशूच्या मैदानात जामखेडचा डंका! होशिंग विद्यालयाच्या खेळाडूंची पदकांची लयलूट, ६ खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र”

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. जिल्ह्यातील विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. वुशूच्या मैदानावर खेळाडूंची चपळाई, कौशल्य, ताकद आणि आत्मविश्वास यांचा थरारक संगम पाहायला मिळाला.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत ल. ना. होशिंग विद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल पाच सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेड येथे प्रशिक्षण घेत आहेत.

🥇 सुवर्णपदक विजेते
मकरंद जगताप
आदित्य गोरे
श्रेयश वराट
अंजली लोखंडे
मयूर शिरगिरे
🥈 रौप्यपदक
यश पवार

या सर्व खेळाडूंची विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात होणारी विभागीय वुशू स्पर्धाही जामखेड येथेच आयोजित करण्यात येणार असल्याने स्थानिक खेळाडूंना आपल्या घरच्या मैदानावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

या यशामुळे ल. ना. होशिंग विद्यालयासह आयडियल स्पोर्ट अकॅडमीच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची मेहनत यामुळे जामखेडमधील वुशू खेळाडू जिल्हा तसेच विभागीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम
जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी संतोष वाबळे, विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक सुदाम वराट, मुकुंद राऊत, प्रल्हाद साळुंके, राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, धीरज पाटील, अनिल खराडे , संजय डफळ, वुशू संघटनेचे सचिव लक्ष्मण उदमले, रोहित थोरात, विशाल धोत्रे, प्रणव सोनवणे, कृष्णा वनवे, संदेश गोरे, योगेश वाघमोडे कोमल डोकडे, सुग्रीव ठाकरे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जामखेडमध्येच होणाऱ्या आगामी विभागीय स्पर्धेकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे हे खेळाडू विभागीय स्तरावरही पदकांची कमाई करतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या सह सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य, उपप्राचार्य उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!