Home ताज्या बातम्या जामखेडच्या संस्कार खिलारेंची राष्ट्रीय स्तरावर दमदार भरारी! स्व. एम. ई. भोरे...

जामखेडच्या संस्कार खिलारेंची राष्ट्रीय स्तरावर दमदार भरारी! स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राष्ट्रीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व

0
12
जामखेडच्या संस्कार खिलारेंची राष्ट्रीय स्तरावर दमदार भरारी!  स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राष्ट्रीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या संस्कार खिलारेंची राष्ट्रीय स्तरावर दमदार भरारी!

स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राष्ट्रीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व

जामखेडच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी संस्कार खिलारे याची धनुर्विद्या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेत संस्कार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना व नंदुरबार जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत पाडळी येथील सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौंडेशन चे स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज येथील संस्कार संजय खिलारे याने उल्लेखनीय कामगिरी केली.

संस्कारने इंडियन राऊंड बॉईज गटात कांस्यपदक पटकावले. या कामगिरीच्या जोरावर राजस्थानमधील जयपूर येथे दि. २१ ऑक्टोबर २०२६ पासून होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर धनुर्विद्या चॅम्पियनशिपसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

दि. ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान चालु असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने अचूक नेमबाजी व सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले.
संस्कारला क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक प्रा. सुनील घाडगे आणि जुबेर पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्कारच्या यशाबद्दल सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे, सचिव तथा प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड भोरे, संचालक प्रा. तेजस भोरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!