Saturday, September 5, 2026
Home ताज्या बातम्या ज्ञानदानापासून योगसेवेपर्यंत अखंड वाटचाल असणारे बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...

ज्ञानदानापासून योगसेवेपर्यंत अखंड वाटचाल असणारे बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

0
2
ज्ञानदानापासून योगसेवेपर्यंत अखंड वाटचाल असणारे बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

जामखेड न्युज – – – – – – – 

ज्ञानदानापासून योगसेवेपर्यंत अखंड वाटचाल असणारे बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

ज्ञानदानाची तळमळ, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, संस्कारक्षम शिक्षणाची कास आणि योगविद्येच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब आप्पा पारखे यांना जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कै. सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान, जामखेड यांच्या वतीने २०२६ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल कोठारी होते. प्रमुख अतिथी म्हणून दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, संस्थेचे सचिव अरुणशेठ चिंतामणी, जामखेड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजल अमित चिंतामणी, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, जयश्री देशमुख, संचालक दीपक होशिंग, डॉ. प्रताप गायकवाड, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, रमेश अडसूळ, दत्तात्रय काळे, शहाजी वायकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज शिंदे, सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन संस्थेचे संचालक डॉ. संजय भोरे, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, पत्रकार संतराम सूळ, अशोक निमोणक, नासीर पठाण, मिठुलाल नवलाखा, संजय वारभोग, मनोज कुलथे ,रोहिदास केकाण वैभव कटारिया, दीपक भोरे, डॉ. कासम शेख, डॉ. गोरख गायकवाड, सौ. सुरेखा देसरडा, सौ सुनंदा लुंकड, प्राची लुंकड यांच्यासह ल. ना होशिंग विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.

‘ज्ञान देण्याची तळमळ असलेले शिक्षक’
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

पारखे सरांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांच्या ज्ञानदानाच्या तळमळीचा विशेष उल्लेख केला. ल. ना. होशिंग विद्यालयाची शैक्षणिक परंपरा पुढे नेण्यात पारखे सरांचे योगदान महत्त्वाचे असून, ते विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची तोफ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.
‘पारखे सरांचे संस्कार आयुष्यभर उपयोगी’ पडणार असे सांगितले 

नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. पारखे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेले संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील. त्यांच्या कार्यामुळे ल. ना. होशिंग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे त्यांनी सांगितले.

‘विद्यार्थी हेच माझे दैवत’ – प्राचार्य बाळासाहेब पारखे
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. १९९२ पासून आपण शिक्षण क्षेत्रात सेवा करत असून संस्थेकडून नेहमीच आदर्श कार्य करण्याची प्रेरणा मिळत आली, असे त्यांनी सांगितले.जामखेड परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी योगविद्येचे धडे गिरवत असून, योगाच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या कार्यात कधीही शिळा नैवेद्य दाखवला नाही. हा पुरस्कार माझा नसून संस्था आणि माझ्या विद्यार्थ्यांचा आहे,” अशी भावनिक भावना पारखे सरांनी व्यक्त केली.

कोठारी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक यावेळी कै. सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचेही मान्यवरांनी कौतुक केले. कोरोना काळात तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये प्रतिष्ठानने केलेल्या मदतीमुळे परिसरात संजय कोठारी यांची ‘देवदूत’ म्हणून ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून देहदानासारख्या सामाजिक संकल्पना राबविल्या जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मनोगत व्यक्त करताना, “ज्या शाळेत मी शिक्षण घेतले, त्याच शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” अशी भावना व्यक्त केली. आई-वडिलांनंतर गुरू हे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. स्मृतीचिन्हाचे वाचन पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी केले सुत्रसंचलन निलेश दिवटे तर मुकुंद राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!