नारायण राणेंना अटक झाल्याने जामखेड मध्ये भाजपा आक्रमक – खर्डा चौकात केले रस्ता रोको अंदोलन

0
329
जामखेड प्रतिनिधी 
        जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात  वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्यात आली. या मुळे जामखेड मध्ये भाजप कार्यकर्ते अक्रमक झाले. भाजप च्या वतीने सायंकाळी शहरातील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली. नारायण राणे यांच्याविरोधात सर्वात प्रथम नाशिक आणि नंतर महाड, ठाणे, पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने जामखेड मध्ये देखील कार्यकर्त्यांनी रास्तारोको अंदोलन करत घोषणा दिल्या, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। ठाकरे सरकारचं करायचं काय ? खाली मुंडक वर पाय! या घोषणांनी खर्डा चौक दुमदुमुन गेला. यावेळी भारतीय जनता पार्टी कर्जत – जामखेड विधानसभा संपर्क प्रमुख रवि सुरवसे यांनी बोलताना सांगितले की, या आघाडी सरकारचा निषेध करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वरील गुन्हे मागे घ्या अन्यथा यापेक्षाही तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या रस्ता रोको अंदोलनात भाजप चे तालुका अध्यक्ष अजय काशिद, रवि सुरवसे, मनोज कुलकर्णी, शरद कार्ले, आभिजित राळेभात, तात्याराम पोकळे, मदन गोलेकर, पांडुरंग उबाळे, प्रविण बोलभट, मोहन गडदे, सोमनाथ राळेभात, संजय कार्ले, अर्जुन म्हत्रे, कैलास नटके, विष्णु गंभीरे, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाधक्ष अजय काशिद यांनी देखील ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here