जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले होते. शेतकऱ्यांना एकत्रित करून सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आशिया खंडातील पहिला शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना सुरू केला. सहकारातून समाजपरिवर्तन घडविणारे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे आजच्या पिढीला आदर्श ठरत आहे, असे मत नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येते जामखेड येथे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा.अरुण वराट, सचिन माने, हरिदास माने, गणेश पोकळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमोल राळेभात यांना आंब्याचे झाड देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की, आजच्या पिढीला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य आदर्श आहे. १९५० मध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करत शेतकर्यांपर्यंत सहकाराचे तत्व नेले व शेतकर्यांचे जीवन समृद्ध बनविले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. अरुण वराट यांची केले तर आभार हरिदास माने यांनी मानले.






