दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय, जामखेड आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
१० नामांकित कंपन्यांतून थेट भरती या रोजगार मेळाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील १० नामांकित आस्थापना सहभागी होणार असून उत्पादन, ऑटोमोबाईल, फार्मा, बँकिंग, आयटी, सेल्स अँड मार्केटिंग, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांतील शेकडो पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कोणासाठी? बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा तसेच सर्व शाखांतील पदवीधर विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी हा मेळावा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय उमेदवारांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, स्वयंरोजगार योजना व उद्योग क्षेत्रातील नव्या संधींची सविस्तर माहितीही दिली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे इच्छुकांनी मुलाखतीसाठी येताना बायोडाटा, शैक्षणिक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत. नोंदणी पूर्णपणे मोफत असून सकाळी ९:०० पासून महाविद्यालयात नोंदणी सुरू होईल.
संस्थेचे आवाहन या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक-युवतींनी घ्यावा, तसेच तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय व प्रशिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उद्धव बापू देशमुख,
उपाध्यक्ष मा. श्री. दिलीपशेठ गुगळे, सचिव मा. श्री. अरुणकाका चिंतामणी, माजी सचिव मा. श्री. शशिकांतजी देशमुख, माजी खजिनदार मा. श्री. राजेशजी मोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केळकर जी. डी., उपप्राचार्य डॉ. नरके एस.वाय., आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. गाडेकर एस. एन., कला शाखाप्रमुख प्रा. फलके ए. बी., रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गोलेकर एस.एम., वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. राऊत एन. बी.आणि प्लेसमेंट समन्वयक डॉ. तरटे एन. बी. यांनी केले आहे.
“शिकलेल्या हातांना काम द्या – रोजगार मेळाव्यातून उज्वल भविष्य घडवा!”