Sunday, June 21, 2026
Home ताज्या बातम्या शरीराकडे दुर्लक्ष म्हणजे रोगांचे माहेरघर – प्राचार्य बाळासाहेब पारखे ल.ना. होशिंग विद्यालयात...

शरीराकडे दुर्लक्ष म्हणजे रोगांचे माहेरघर – प्राचार्य बाळासाहेब पारखे ल.ना. होशिंग विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

शरीराकडे दुर्लक्ष म्हणजे रोगांचे माहेरघर – प्राचार्य बाळासाहेब पारखे

ल.ना. होशिंग विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. भारत सरकारने योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडून संपूर्ण जगाला त्याची उपयुक्तता पटवून दिली. हजारो वर्षांपासून भारतात योगसाधनेची परंपरा सुरू असून त्याचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ आहेत. योगसाधना, प्राणायाम तसेच ध्यानधारणेद्वारे मानवी शरीर आणि मनाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी व संतुलित जीवन जगणे शक्य होते, असे प्रतिपादन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी केले.

दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन रविवार (दि. २१ जून २०२६) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुण चिंतामणी, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनिल कटारिया, खजिनदार शरद देशमुख, संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे,मनोज कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, शहाजी वायकर, ज्येष्ठ लिपिक रामचंद्र होशिंग,पालक विजय काशिद आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी योगशिक्षक तथा प्राचार्य बाळासाहेब पारखे म्हणाले की, रोगट असणाऱ्या शरीराला संपूर्ण जगच रोगट दिसते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराकडे आणि आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज आहे. शरीराकडे दुर्लक्ष करणे म्हणजे रोगांचे माहेरघर निर्माण करण्यासारखे आहे. नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि संतुलित जीवनशैलीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.

यावेळी प्राचार्य बाळासाहेब पारखे,उपप्राचार्य प्रा.युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे,मुकुंद राऊत, बाबासाहेब समुद्र, प्रा. विश्वनाथ आघाव, संजय समुद्र, पांडुरंग वराट, सतीश डूचे,वरिष्ठ लिपिक बाबासाहेब धनवडे, विशाल पोले, उमाकांत कुलकर्णी, आदित्य देशमुख,साई भोसले तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षक व मान्यवरांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके, बापूसाहेब जरे, धीरज पाटील, संतोष देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट जगदाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!