जामखेड प्रतिनिधी
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनता आणि प्रशासनामधील महत्वाचा दुवा आहे. प्रशासन आणि पत्रकार यांचा समन्वय चांगला असेल तर अनेक समस्यांचे निराकरण होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड बोलत होते.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, बाळासाहेब वराट, अविनाश बोधले, मोहिद्दीन तांबोळी, संजय वारभोग, ओंकार दळवी, सत्तार शेख, लियाकत शेख, यासीन शेख, पप्पूभाई सय्यद, नंदुसिंग परदेशी, किरण रेडे, औचरे यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, पत्रकार व पोलीस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी सकारात्मक विचार करून काम केले तर आपण समाजात चांगला आदर्श निर्माण करू शकतो.
यावेळी अनेक पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.