जामखेड प्रतिनिधी
दुर्मिळ व संरक्षित जातीच्या श्रुन्घी घुबडाची तस्करी
करताना धाराशिव जिल्ह्यातील पाच व बीड जिल्ह्य़ातील एक अशा सहा जणांना जामखेड पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले. वनविभागाने वन्य पक्षी तस्करी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
सदर सहाआरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली की, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, शहरातील मिलिंदनगर शेजारी असलेल्या नागेश विद्यालयाच्या मोकळ्या जागेत सहा इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत अशी माहिती मिळाली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, शेषराव म्हस्के, आबासाहेब अवारे, सचिन राठोड, संग्राम जाधव, अरूण पवार, अविनाश ढेरे यांच्या पथकाने त्या परीसरात छापा टाकून आरोपी लखन उर्फ लक्ष्मण सतिश भोसले वय 19 रा. भवनवाडी ता. भूम, राहुल निवृत्ती पवार वय 25 रा. काशिमबाग ता परांडा, दिपक राजाभाऊ गायकवाड वय 27 रा. सिध्देश्वर नगर बीड, गणेश निवृत्ती पवार वय 24 रा. काशिमबाग ता. परांडा, हरी नेमीणाथ काळे वय 19 रा.सामनगाव ता. भुम, ज्ञानेश्वर निवृत्ती पवार वय 20 रा. परांडा अशा सहा जणांना ताब्यात घेतले.
त्यांची झाडाझडती घेतली आसता त्यांच्या कडे एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत बेकायदेशीर रित्या श्रुन्घी जातीचा घुबड पक्षी तस्करीच्या उद्देशाने वाहतुक करताना आढळून आला. यानंतर सदरची घटना वनविभागाच्या अखत्यारीत येत आसल्याने पुढील कारवाई वनविभागाने केली. यानंतर
वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड, वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे, वनरक्षक के. आय. पवार, आर एस देवकर, वनरक्षक ताहेर अली सय्यद, के एस गांगुर्डे, पी एस उबाळे, रामभाऊ मुरुमकर, चिलगर, डोंगरे अजिनाथ भोसले, सुरेश भोसले हे अधिकारी व कर्मचारी हजर होते. आज सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पकडण्यात आलेल्या सहा आरोपींकडे अतिशय दुर्मिळात
दुर्मिळ असे श्रुन्घी घुबड आढळून आले आहे. त्या घुबडाच्या पायास दहा नखे आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग जादुटोणा करण्यासाठी होऊ शकतो तसेच त्या कारणास्तव या घुबडाची विक्री केल्यास मोठी किंमत मिळते त्यामुळे त्याची तस्करी होत होती असा अंदाज जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वनविभागाने या दुर्मिळ श्रुन्घी घुबडाची वैद्यकीय तपासणी करून नंतर त्याला जंगलात सोडून मुक्त केले जाईल असे वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांनी सांगितले.