जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील आदर्श गाव झिक्री गावात गावातील लोकांचे संबंध सलोख्याचे राहावेत निवडणूकीच्या कारणाने गावात वादंग निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व सचिन गायवळ यांनी गावातील सर्व लोकांची बैठक घेतली व बिनविरोधचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व ग्रामस्थांनी सहमती दर्शवली आणी सात सदस्यांची नावे आरक्षणानुसार काढली.
ते सात बिनविरोध सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.
सौ.नंदा दत्तात्रय साळुंके, श्रीकांत बापुराव साठे, अनुराधा मोतीराम गायवळ (साळुंके), गोजरबाई आत्माराम सकट,
चंद्रकांत मुरलीधरआजबे, अरीफाबी अफजल पठाण,
धनंजय देविदास कसाब या सात सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
ग्रामपंचायत झिक्री बिनविरोध करण्यासाठी मंगेशदादा आजबे, रमेश दादा आजबे, सचिन साळुंके, बाबासाहेब इथापे ,पोपट कसाब, सुभाष पवार ,इथापे सर , श्रीधर जिवडे, दादाभाई पठाण, रणजित साळुंके, भाऊसाहेब साळुंके, सचिन खैरे, व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यने बिनविरोध करण्यात आली.