Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या कारगिल युद्धाचे साक्षीदार निवृत्त कर्नल किसनराव काशिद यांचे निधन

कारगिल युद्धाचे साक्षीदार निवृत्त कर्नल किसनराव काशिद यांचे निधन

0
301
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड तालुक्याचे भुषण तथा सारोळा गावचे सुपुत्र निवृत्त कर्नल किसनराव आनंदराव काशिद यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी ३५ वर्षे भारतीय लष्करात सेवा केली. त्यांनी भारत-चीन युध्दात तसेच १९७१ च्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धात थ्रीजीआर (गुरखा रेजिमेंट) कमांडिंग आॅफिसर म्हणून नेतृत्व केले.
निवृत्तीनंतर बीड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी तरूणांसाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबविले. स्वातंत्र्य सैनिक कै. साहेबराव पवार यांचे जेष्ठ जावई तसेच डॉ. कल्याणराव काशिद यांचे थोरले बंधू व माजी महाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अहमदनगर येथील निंबोडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व अप्तस्वकिय  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!