जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपुर्ण अर्थकारण बदलण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दि. २३व २४ आॅगस्ट दरम्यान दोन दिवसीय कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा अहमदनगर व कांदा-लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार संघातील कर्जत व जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपुर्ण अर्थकारण बदलण्यासाठी “कांदा बी ते बाजारपेठ या विषयावर या परिसंवादात चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

हा परिसंवाद दि. २३ आॅगस्ट कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील कोपर्डी सभागृहात सकाळी ९ ते १२ वाजे दरम्यान २ ते ५ दरम्यान म्हाळंगी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर तर सायंकाळी ६ ते ८:३० दरम्यान राधेश्याम मंगल कार्यालय अंबी जळगाव येथे तर दि. २४ आॅगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील सभागृहात सकाळी ९ ते १२ वाजे दरम्यान तर दुपारी २ ते ५ दरम्यान जवळके येथील सभामंडप येथे होणार आहे.
तरी कर्जत व जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने या परिसंवादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.