जामखेड मध्ये एकच वेळी सहा ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले
नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये खर्डा पोलिस स्टेशन पथकास जामखेड शहरात जाऊन बीडरोड येथील अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर एकच वेळी छापे टाकून कारवाई केली आहे. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी खर्डा पोलिस स्टेशनचे स्टाफसह छापे टाकून कारवाई केली असता खालील प्रमाणे 06 हॉटेल वर अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे एकूण 21785 रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आले असून त्याचेवर जामखेड पोलिस स्टेशन येथे दारूबंदी कायद्यान्वये 06 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाई झालेल्या हॉटेल आणि इसम 1)हॉटेल संग्राम, बीडरोड जामखेड येथे इसम विशाल दादा रेटे रा जामखेड
2)हॉटेल जयभवानी, बीडरोड येथे इसम ओमकार हनुमंत माने रा जामखेड
5)हॉटेल निलकमल, बीडरोड जामखेड येथे इसम अमोल बाजीराव खरात रा जामखेड
6)हॉटेल मधुबन, बीडरोड जामखेड येथे इसम संजय भगवान पवार रा जामखेड
सदर बाबत पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, गोकुळ इंगोले, बाळू खाडे, वैजनाथ मिसाळ, पंडित हंबर्डे असे खर्डा पोलीस व होमगार्ड यांनी केली आहे.
अवैध धंदे विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहील असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
चौकट नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कारवाई चे नवीन तत्र अवलंबिले आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई साठी दुसर्या पोलीस स्टेशनच्या स्टाफला आदेश देयचे या उपक्रमाचे सर्व सामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. कारण स्थानिक पोलीस व अवैध दारू विक्रेते यांचे लागेबांधे असतात.