जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत विद्याभारती क्लासेसने घवघवीत यश संपादन केले आहे. क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागला आहे. १३ पैकी १३ विद्यार्थी पास झाले आहेत तर सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यामुळे विद्याभारती क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडमवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
एनएमएमएस परीक्षेसाठी विद्याभारती क्लासेस मधील १३ विद्यार्थी बसले होते क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडम यांची सर्व विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करून घेतली त्यामुळे १३ ही विद्यार्थी पास झाले तर सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.

अविष्कार दळवी यांने १५५ गुण घेत तालुक्यात पहिला तर जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. सार्थक गर्जे यांने १५१ गुण मिळवत तालुक्यात दुसरा तर जिल्ह्यात दहावा क्रमांक पटकावला आहे. अनघा कुलकर्णी १४५, गार्गी राळेभात १३७, शार्दूल आदमाने १३७, श्रावणी माने १३३, अथर्व परदेशी ८९ असे सात विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना वर्षाला बारा हजार रुपये प्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. योग्य व नियोजनबद्ध सराव करून घेत विद्याभारती क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. कोरोना काळातही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांचा सुयोग्य पद्धतीने सराव घेत विद्याभारती क्लासेसने घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्याभारती क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडमवर शंभर टक्के निकालामुळे अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.