Wednesday, May 20, 2026
Home ताज्या बातम्या पती-पत्नी दोघांनाही API पदी बढती साकत (पिंपळवाडी) च्या शिरपेचात मानाचा तुरा

पती-पत्नी दोघांनाही API पदी बढती साकत (पिंपळवाडी) च्या शिरपेचात मानाचा तुरा

0
2

जामखेड न्युज – – – – – 

पती-पत्नी दोघांनाही API पदी बढती

साकत (पिंपळवाडी) च्या शिरपेचात मानाचा तुरा

आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत पीएसआय पदी नियुक्ती झालेले व पीएसआय असणारीच सहकारी कांचन हिचाशी विवाहबद्ध होत दोघांनीही आपल्या कामाचा ठसा उमटविला आणि आता दोघांनाही पीएसआय ते एपीआय बढती मिळाल्याने साकत पिंपळवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तसेच नेमाने दाम्पत्याने
ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

PSI ते API पदोन्नती
राज्यभरात दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या ४८८ पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) गृह विभागाने नुकतीच ‘सहाय्यक पोलीस निरीक्षक’ (API) पदावर पदोन्नती दिली आहे. यात नेमाने दाम्पत्याचा समावेश आहे.

सुमारे अकरा वर्षापुर्वी अंगत नेमाने याची पीएसआय पदी निवड झाली होती ते सध्या कोथरूड पोलीस स्टेशन पुणे येथे कार्यरत आहेत तसेच याच काळात कांचन यांचीही पीएसआय पदी निवड झाली त्या सध्या बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे कार्यरत आहेत.

ही पदोन्नती प्रक्रिया बऱ्याच काळापासून रखडली होती. त्यामुळे पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. आता ही बढती मिळाल्याने PSI अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामुळे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राबवता येईल.

चौकट
पती-पत्नी दोघांनाही API पदी बढती

ही पोलीस दलासाठी व गावासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या परिस्थिती ची जाणीव ठेवत सुट्टीत गावी आल्यावर आपल्या प्राथमिक शाळा पिंपळवाडी व माध्यमिक श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे आवर्जून भेट देत मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही करतात दोघांनाही बढती मिळाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!