ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे सावित्रीच्या लेकींचा सत्कार

0
278

जामखेड प्रतिनिधी

ल.ना.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राष्ट्रीय कन्या दिन, महिला मुक्ती दिन,जागतिक महिला शिक्षण दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध महिला डॉक्टर नजीरा शेख यांचा सत्कार प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ,ज्येष्ठ शिक्षक  बाळासाहेब पारखे , प्रवीण गायकवाड, शहाजी वायकर,  कलाशिक्षक मुकुंद राऊत, शिक्षक प्रतिनिधी पोपट जगदाळे, संभाजी कारंडे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले  रोहित घोडेस्वार  सुभाष बोराटे,  हनुमंत वराट , विजय क्षीरसागर सर, अविनाश नवगिरे उपस्थित होते.
प्रसंगी मनोगतामध्ये प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी डॉक्टर नजीरा शेख डॉक्टरी पेशातील उत्तम कार्याचा उल्लेख व माहिती मनोगतामध्ये व्यक्ती केली.  महत्त्वाचा भाग म्हणजे  असंख्य महिलांच्या जीवनामध्ये मातृत्वाचा आनंद मिळाल्याचे नमूद केले याचबरोबर सुप्रसिद्ध डॉक्टर नजीरा शेख यांनीही यात शाळेची विद्यार्थिनी आहेत आपले मनोगत व्यक्त करत धन्यवाद दिले. त्यानंतर महिला शिक्षिका श्रीमती संगीता दराडे व श्रीमती सुप्रिया घायतडक  यांचाही महिला शिक्षण दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ल.ना.होशिंग विद्यालयातील शिक्षकांनी  ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हॉस्पिटल जामखेड या ठिकाणी जाऊन त्याठिकाणच्या सावित्रीच्या लेकी सौ. शहाबाई कापसे, सौ शेख सुलताना, सौ उमा कोल्हे, सौ सुवर्णा खंडागळे, सौ लक्ष्मी बाई मुंडे,सौ दमयंती अडागळे या सर्व महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
   तसेच जामखेड पोलिस स्टेशन या ठिकाणी जाऊन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड  यांचा सत्कार प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर येथील महिला पोलीस कर्मचारी अनिता निकम व सपना शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. व जामखेड पोलिस स्टेशन मार्फत श्रीमती संगीता दराडे व श्रीमती सुप्रिया  घायतडक या महिला शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन समारंभ प्रमुख संजय कदम  यांनी सूत्रसंचालन केले तर सुप्रिया घायतडक
आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here