जामखेड न्युज – – – – – –
जामखेड शहरातील जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), येथे उद्या श्री तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

जामखेड शहराती जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती), येथे आई तुळजा भवानी मंदिर, जगदंबा महिला मंडळ यांच्या वतीने मंगळवार रोजी पांडुदेवा शास्त्री (सौताडा ), श्री. काळे देवा (जामखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रोहित (दादा) पवार आमदार कर्जत-जामखेड यांच्या उपस्थितीत श्री तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बरेच वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या सर्वांच्या प्रखर इच्छा शक्ती व आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने आपल्या जय मल्हार नगर (टेकाळे वस्ती) येथे सुंदर असे तुळजा भवानी मंदिर निर्माण झाले.

अशा या भव्य दिव्य मंदिरामध्ये आई तुळजा भवानी सिंहासनावर आरुढ झालेली पाहण्यासाठी आता सर्वांनाच आस लागलेली आहे. आपल्या भागातील सासरी नांदत असलेल्या लेकी बाळांनी आपल्या आईच्या मंदिरावर कलश स्थापन करण्यासाठी आपल्या संसारातुन फुल न फुलाची पाकळी आर्थिक देणगी देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे.

श्री. पांडुदेवा शास्त्री (सौताडा ), श्री. काळेदेवा (जामखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजा भवानी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ वैशाख कृ. ।।१०।। मंगळवार दि. १२ मे २०२६ ते १४ मे २०२६ या दरम्यानआयोजित केला आहे.

तरी सर्व लेकी बाळांनी आवर्जुन कार्यक्रमास यावे वआई तुळजा भवानी चे आशिर्वाद प्राप्त करुन प्रसाद घ्यावा हि अपेक्षा.दि. १२ मे २०१६ रोजी दि. १३ मे २०१६ रोजी सायं. ४ ते ८ मिरवणुक स. ९ वा आईचे स्नान, होमहवन व रात्री जागरण होईल





