Friday, April 17, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरातील अनाधिकृत बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करावी भाजपच्या वतीने तहसीलदार व...

जामखेड शहरातील अनाधिकृत बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करावी भाजपच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन

0
2

जामखेड न्युज——

जामखेड शहरातील अनाधिकृत बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करावी

भाजपच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन

जामखेड शहरात अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या तातडीने प्रभावी कारवाई व्हावी यासाठी भाजपच्या वतीने जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने नगरसेवकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

बेकायदेशीर राहणार्‍या नागरिकांना देशाबाहेर हद्दपार करावे असे देखील या निवेदनात म्हटले आहे.

भाजपच्या वतीने शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद यांनी तहसीलदार धनंजय बांगर यांना पुढे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामखेड शहर तसेच तालुक्यात काही ठिकाणी अनाधिकृतरित्या वास्तव करणारे परदेशी (बांगलादेशी) नागरीक रहात असल्याची माहिती मिळत आहे.

अशा अनाधिकृत वास्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

त्यामुळे संबधित यंत्रणांच्या माध्यमातून विषेश शोध मोहीम राबवून जामखेड शहरात संशयित अनाधिकृत रहिवाशियांची तपासणी करण्यात यावी. जे नागरिक बेकायदेशीर कागदपंत्राशिवाय वास्तव्य करत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करुन त्यांना देशाबाहेर हद्दपार करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतावेळी भाजपचे जामखेड शहर मंडलाध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, ॲड. प्रविण सानप, तात्याराम पोकळे, मोहन पवार, हर्षद काळे, प्रविण होळकर, मनोज कुलकर्णी, प्रविण चोरडिया, पवन राळेभात, महेश मासाळ, ज्ञानेश्वर अंदुरे, मोहन गडदे, मनोज गडदे, ऋषिकेश मोरे, विठ्ठल राळेभात, बाळासाहेब गायकवाड व राम हुलगुंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!