Tuesday, July 21, 2026
Home ताज्या बातम्या तालुक्यातील सर्वात मोठ्या देवदैठण येथील खंडोबा यात्रेला आजपासून सुरूवात, घोंगडीसाठी राज्यात प्रसिद्ध...

तालुक्यातील सर्वात मोठ्या देवदैठण येथील खंडोबा यात्रेला आजपासून सुरूवात, घोंगडीसाठी राज्यात प्रसिद्ध मानाच्या व नवसाच्या काठ्यांचा कार्यक्रम

0
83

जामखेड न्युज—–

तालुक्यातील सर्वात मोठ्या देवदैठण येथील खंडोबा यात्रेला आजपासून सुरूवात, घोंगडीसाठी राज्यात प्रसिद्ध

मानाच्या व नवसाच्या काठ्यांचा कार्यक्रम

जामखेड तालुक्यातील देवदैठण खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संपूर्ण राज्यातून यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हजेरी लावतात.  घोंगडी साठी पंचक्रोशीत ही यात्रा प्रसिद्ध आहे. सध्या ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास सुरू आहे.

पंधरा दिवसांपासून यात्रेची तयारी सुरु होते
दि. 07-04-2026 वार मंगळवार रोजी देवाला तेल  व संध्याकाळी पालखी मिरवणूक काढुन यात्रेची सुरुवात होते.

2) 17-04-2026 वार शुक्रवार रोजी चैत्र अमावश्या दिवशी महिला नगर प्रदक्षिणा दंडवत व तळी भंडार कार्यक्रम.

18-04-2026 वार शनिवार रोजी मानाच्या काट्यांचा कार्यक्रम वाजत गाजत देवाला प्रदक्षिणा व कळस दर्शन कार्यक्रम होईल.
व याच दिवशी भर यात्रा व खरेदी विक्री व प्रसिद्ध घोंगडी बाजारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.


नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यातून आलेल्या मानाच्या व नवसाच्या काठ्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी तांबाराजुरी, रत्नापूर, कासेवाडी, लोळदगांव, साबलखेड, जवळा, चिंचोडी पाटील, जेकटेवाडी, केळसांगवी, जवळका, तिंत्रज, शिरपूर, जवळाला, साकत या ठिकाणच्या नवसाच्या व मानाच्या काठ्यांचा कार्यक्रम असतो. मोठ्या उत्साहात मंदिराच्या समोर काठ्यांचा कार्यक्रम असतो.
19-04-2026 वार रविवार रोजी देवाला पुरण पोळी नैवेद्य दाखवुन संध्याकाळी भव्य पालखीची मिरवणूक काढुन यात्रेची सांगता होईल.

यात्रेमध्ये अनेक स्टॉल मिठाईचे दुकान अनेक खेळण्याचे सामग्री घोंगडी बाजार खूप मोठ्या संख्येने याची विक्री होते.

गावकऱ्यांच्या वतीने खूप नियोजित असा बंदोबस्त केला जातो सर्वांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.. प्रत्येक भावीक भक्तांना व्यवस्थितपणे दर्शन त्याचप्रमाणे सर्वांसाठी ह भ प भक्त सम्राट कैलास महाराज भोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाची सोय केली जाते आणि या महाप्रसादाचे अन्नदाते कै. एकनाथ गेणा भराटे गांव- वडाचीवाडी ता. कुर्डूवाडी जि.सोलापूर  प्रत्येक वर्षी या आदर्श अध्यात्मिक परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.  ही यात्रा नियोजित पार पाडावी यासाठी खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने चौक बंदोबस्त केला जातो. या यात्रेमध्ये मानाच्या काट्यांचा खूप मोठा उत्साहाने वाजत गाजत  गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केले जाते. पुजारी अक्षय गुरव 9527126701

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!