जामखेड न्युज—–
जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सुदाम वराट
आज जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची नुतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची कार्यकारीणी
अध्यक्ष – सुदाम वराट श्री साकेश्वर विद्यालय जामखेड
सचिव – संतोष पवार -श्री नागेश विद्यालय जामखेड
उपाध्यक्ष १) शेख जाकिर न्यू इंग्लिश स्कूल पाटोदा
२) कदम सुर्यकांत -जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव
सहसचिव १) चांगुणे भागवत -अरणेश्वर विद्यालय अरणगाव
२) भोंडवे अमोल – जवळेश्वर विद्यालय जवळा
खजिनदार – वराट हनुमंत – ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड
हिशोब तपासणीस – येवले बाळासाहेब

अशा प्रकारे नुतन कार्यकारीणी खालील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे, प्राचार्य बी. ए. पारखे, रमेश अडसूळ, प्राचार्य बी. के.मडके, माजी प्राचार्य दिलीप ढवळे, पी. टी. गायकवाड, मुख्याध्यापक भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, जिल्हा सह सेक्रेटरी मोहन यादव यांच्या सह अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुदानित शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव – ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे
सध्या शिक्षकातील फुटीचा फायदा सरकार घेत आहे. सरकारी तसेच अनुदानित शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. आपण सर्वानी एकत्रित येऊन लढा उभारणे आवश्यक आहे. पेन्शन मध्ये तीन चार प्रकार केले आहेत. वर्गवारी केली आहे. सध्या शिक्षकांवर अन्याय होत आहे. सरकारच्या अन्यायकारक धोरणाविषयी आपण एकत्रित लढा उभारणे आवश्यक आहे. तसेच समाजात सुधारणा करण्यासाठी शिक्षकांनाच लक्ष घालावे लागणार आहे. असे मत ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिडिएफचे अध्यक्ष माजी प्राचार्य दिलीप ढवळे यांनी केले यावेळी रमेश अडसुळ, बी के मडके, बी.ए पारखे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी टी गायकवाड हे होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात संघटनेच्या कामाचा लेखाजोखा मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत वराट यांनी तर आभार भरत लहाने यांनी व्यक्त केले.





