जामखेड न्युज—–
जामखेड ते श्री क्षेत्र तेर पायी ( वाहन) दिंडी सोहळा
१८ वर्षापासून अखंडपणे दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू
आज रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता जामखेड ते श्री क्षेत्र तेर पायी ( वाहन ) दिंडी सोहळा प्रस्थान होणार आहे. यासमयी श्री संत गोरोबा काकांच्या चांदीच्या पादुकांचे पूजन व श्री हरी भजन सेवा होऊन सर्व वारकरी मंडळी समवेत दिंडी प्रस्थान होणार आहे , तरी सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक विनायक राऊत यांनी केले आहे.

संत परिक्षक संत शिरोमणी वैराग्य महामेरू श्री संत गोरोबा काका कुंभार संजीवन समाधी सोहळा जामखेड ते श्री क्षेत्र तेर पायी (वाहन) दिंडी सोहळा वर्ष १८ वे संत वचनानुसार वे.शा.सं. श्री. पांडुरंग देशमुख सौताडा, ह. भ. प. वामन महाराज शिंदे, सरळगांव भागवताचार्य नंदकिशोर महाराज पुराणिक, ह. भ. प. गोविंद स्वामी नाना महाराज यांच्या आशिर्वादाने आणि वै.श्री.विठ्ठलराव (आण्णा) राऊत यांचे प्रेरणेने व वै.तुकाराम महाराज जाधव यांच्या आशिर्वादाने श्री क्षेत्र तेर येथे पुण्यतिथी सोहळामिती चैत्र कृ. १० रविवार दि. १२/४/२०२६ ते चैत्र कृ. १३ बुधवार दि. १५/४/२०२६ पर्यंत आयोजित केला आहे.

आज रविवार दुपारी १२.३० वाजता माऊली संकुल , श्री गोरोबा काका कुंभार ना. सह.पतसंस्था. बीड रोड , जामखेड येथून दिंडी प्रस्थान होणार आहे.

या दिंडी सोहळ्यात मान्यवर किर्तन करांचे किर्तन सेवा होणार आहे. रविवारी हभप मधुकर महाराज, सोमवारी चेतन महाराज बोरसे, ज्ञानेश्वर महाराज घोडके, मंगळवार हभप शिवाजी महाराज लोणकर, संतोष महाराज बांगर, बुधवारी हभप कैलास महाराज भोरे यांचे काल्याचे किर्तन होईल.

दिंडी सोहळ्यात अनेक मान्यवर महाराज, वादक, गायक उपस्थित राहणार आहेत. ह.भ.प.दिपक महाराज खरात, तेर, ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु, ह.भ.प.मनोहर महाराज शिंदे, ह.भ.प. विजय बागडे सर, ह.भ.प. ईश्वर महाराज कुंभार, ह.भ.प. पंढरीनाथ राजगुरू ह.भ.प.गाडे महाराज, ह.भ.प. सिताराम राळेभात, ह.भ.प. संतोष बारगजे, ह.भ.प. अशोक महाराज जाधव, श्री. सतिशदादा दरेकर (मा. प्रदेशाध्यक्ष ) श्री. विश्वनाथजी कोलमकर (नांदेड), श्री. नागनाथराव कुंभार (उमरगा), श्री.मोहनराव जगदाळे, श्री. आनंदा साळवी साहेब (मंत्रालय, मुंबई), श्री. शामशेठराजे (निरा)श्री.सोमनाथशेठ सोनवणे (दिंडोरी), श्री. रंगनाथ सुर्यवंशी (नाशिक), श्री. रमाकांत क्षिरसागर (नाशिक), श्री. पाडुरंग कुंभार (कळंब), श्री. विजयराव देवडे (नांदेड),श्री. सुरेश कुंभार (नि. तहसिलदार, सासवड), श्री. घोडके मामा (पैठण), श्री. निलेश राऊत (नाशिक), श्री विठ्ठल भजनी मंडळ, जामखेड, श्री नागेश्वर भजनी मंडळ, जामखेड,चिंचोली महिला भजनी मंडळ, दिंडोरी भजनी मंडळी, ह.भ.प. शिवाजी महाराज लोणकर, ह.भ.प. हरिभाऊ जठार, ह.भ.प. उद्धव महाराज कुंभार, ह.भ.प.बबनराव गोरे सर,श्री. रामनाथ वाघचौरे गुरूजी मृदंगाचार्य : मृ.वि.रोहित म. सानप (पाटोदा), मृ. वि. ओंकार महाराज सुतार (जामखेड)










