सावधान परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट,बावी येथे रात्री दोन ठिकाणी घरफोडी, रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास
जामखेड तालुक्यात ग्रामीण भागात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. रात्री घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास करत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बावी येथे रात्री दोन ठिकाणी घरफोडी झालेली आहे. अभिजीत भास्कर निकम व अभिमान मोहन पवार यांची घरफोडी झालेली आहे.
तालुक्यातील बावी येथील अभिजीत भास्कर निकम वय 29 वर्ष धंदा शेती यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बावी येथे मी, पत्नी गायत्री, आई अशाबाई, वडील भास्कर, मुलगी आराध्या असे एकत्र राहतो व शेती करून कुटुंबाची उपजिवीका भागवतो. काल दि.11/04/2026 रोजी रात्री 11/00 वा. सुमारास मी व घरातील सर्व लोक जेवन करून घराचे दरवाजा लोटुन घेतला होता.
आई, वडील घराचे बाहेरच्या पडवीत झोपले होते व मी घरात बेड रूम मध्ये झोपलो होतो. त्यानंतर दि.12/04/2026 रोजी पहाटे 04/30 वा. सुमारास माझी आई अशाबाई हिने मला उठवले व म्हणाली की, घरात कोणीतरी प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट व किचन मधील धान्याचे डब्ब्याची उचका पाचक केलेली आहे.
तेव्हा मी व माझी पत्नी असे हॉल व किचन मध्ये जावुन पाहिले असता साहित्यांची उचकापाचक केलेले दिसले तसेच किचन मधील तांदुळाचे डब्यात ठेवलेले सोन्याचे दागीने ठेवलेले पाकीट पाहिले असता ते मिळुन आले नाही. तसेच त्याच डब्यात 10,000/- रूपये रोख रक्कम ठेवलेली मिळुन आली नाही.
तेव्हा आम्ही घरातील लोकांनी सोन्याचे दागीने ठेवलेले पाकीट व रोख रक्कमेचा घरात इतर ठिकाणी शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. चोरीस गेलेल्या सोन्याचे दागीने व रोख रक्कमेचे वर्णन खालील प्रमाणे 1) 62,500/- रूपये रक्कमेचे 25 ग्राम वजनाचे सोन्याचे दागीने त्यामध्ये गंठण, बोरमाळ, कानातील झुबे
2) 10,000/- रोख रक्कम त्यामध्ये 500 रु दराच्या 20 नोटा. असा एकुण 72,000/- रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
तसेच आज दि.12/04/2026 रोजी सकाळी 06/00 वा.सुमारास बावी गावातील अभिमान मोहन पवार याचे ही घरात रात्री चोरी झाले असल्याचे समजले.
वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे करत आहेत.