जामखेड च्या जिल्हा परिषद शिक्षिका सारिका निमसे-सस्ते यांची गटविकास अधिकारी-अ पदी निवड.
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव उंडा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सारिका निमसे-सस्ते यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा 2024 (MPSC) मधून गट विकास अधिकारी गट-अ (Block Development officer Group A) पदी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रथम त्या पिंपळगाव उंडा या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत असताना विद्यार्थी अध्यापनाबरोबरच योग्य नियोजन व नियमित सातत्याच्या जोरावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित 2022 मधून त्यांची निवड महिला व बाल विकास अधिकारी (वर्ग-२) पदावर तर 2024 मधून गट विकास अधिकारी वर्ग 1 या पदावर निवड झाली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेले आहे. सध्या त्या धाराशिव या ठिकाणी परिविक्षाधीन महिला व बाल विकास अधिकारी वर्ग 2 म्हणून कार्यरत आहेत.
या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सारिका निमसे सस्ते यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांच्या पाठिंब्याला, मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाला व सहकाऱ्यांच्या मदतीला दिले आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.