क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे समाजासाठी योगदान अतुलनीय – पायलताई बाफना जामखेड शिवसेनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे समाजासाठी योगदान अतुलनीय – पायलताई बाफना
जामखेड शिवसेनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. असे मत जामखेड च्या शिवसेनेच्या नेत्या पायलताई बाफना यांनी व्यक्त केले.
द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांना जामखेड शिवसेनेच्या वतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून पुष्पांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शबनम इमानदार मॅडम, पायल ताई बाफना, रेखाताई देवकाते, शिवसेना युवा नेते आकाश बाफना, शहर प्रमुख मोहन देवकाते, अशोक कुमटकर, व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
भारतामध्ये आज महिला घरापासून ते विमान चालवण्यापर्यंत भारताच्या प्रत्येक गतिमान कार्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या महिलांना या शिखरावर पोहोचवण्यासाठी शिक्षणाचा भक्कम पाया रचणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व पाठबळ भारताच्या प्रत्येक महिलेच्या सक्षमीकरणासाठी हे मोलाच आहे.
अशा या महान व्यक्तींच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आदर्श घेऊन महिला सक्षमीकरण व प्रबली लीकरण यासाठी कार्य करत राहणार असे वक्तव्य पायलताई बाफना यांनी केले.
यावेळी सर्वांनी पुष्पांजली वाहून विनम्र अभिवादन केले.