Thursday, April 2, 2026
Home शैक्षणिक बातम्या जिल्हा परिषद धामणगावची शाळा माझी आदर्श शाळा, इथे शिकणे हा एक आनंददायी...

जिल्हा परिषद धामणगावची शाळा माझी आदर्श शाळा, इथे शिकणे हा एक आनंददायी अनुभव आदर्श शाळा व भौतिक सुविधा साठी शिक्षक, सरपंच महारुद्र महारनवर, ग्रामपंचायत, सेवा संस्था व माजी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य

0
2

जामखेड न्युज—–

जिल्हा परिषद धामणगावची शाळा माझी आदर्श शाळा, इथे शिकणे हा एक आनंददायी अनुभव

आदर्श शाळा व भौतिक सुविधा साठी शिक्षक, सरपंच महारुद्र महारनवर, ग्रामपंचायत, सेवा संस्था व माजी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य

अहिल्यानगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली माझी आदर्श शाळा उपक्रमामध्ये जामखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता.जामखेड शाळेची अहिल्यानगर जिल्हा माझी आदर्श शाळा उपक्रमामध्ये निवड झाली आहे.

धामणगाव जिल्हा परिषद माझी आदर्श शाळा ही ज्ञानाचे मंदिर, स्वच्छ परिसर, शिस्तप्रिय वातावरण आणि सुसज्ज सुविधांनी युक्त आहे. येथे अभ्यासासोबतच क्रीडा, कला आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. शिक्षक मित्रप्रेमी असून, डिजिटल क्लासरूम आणि पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय माझ्या शाळेला खास बनवतात, जिथे शिकणे हा एक आनंददायी अनुभव आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव शाळा माझी आदर्श शाळा करण्यामध्ये तसेच भौतिक सुविधा विकसन करण्यामध्ये धामणगावच्या सरपंच ज्योतीताई महारुद्र महारनवर, माझी सरपंच महारुद्र विष्णू महारनवर, उपसरपंच गणेश थोरात तसेच संपूर्ण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर नरसिंग महारनवर तसेच सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन महावीर घुमरे तसेच सर्व सदस्य, माझी विद्यार्थी संघ अध्यक्ष हनुमंत (बालाजीभाऊ) घुमरे तसेच सर्व माजी विद्यार्थी यासर्वांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

सदर उपक्रमांतर्गत शाळेची आकर्षक इमारत, सुंदर रंगरंगोटी, अध्ययन-अध्यापनात इ-लर्निंग साधनांचा वापर, विद्यार्थी गुणवत्ता, शाळेत सुरू असलेले विविध उपक्रम, मिशन आरंभ-नवोदय-शिष्यवृत्ती इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमधील यश, शालेय दप्तर, गुणवत्ता वाढीकरिता शिक्षकांनी घेतलेली मेहनत आदी बाबींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आदर्श शाळा वाटचालीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारीअशोक आंधळे, तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख केशवतात्या गायकवाड, विशेष शिक्षक शशिकांत वैद्य या सर्व अधिकारी वर्गांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थी गुणवत्ता हे ध्येय ठेवून माझी आदर्श शाळा उपक्रमामध्ये जामखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविण्यामध्ये मेहनत घेणारे शाळेचे मुख्याध्यापक रुपेश सुभाष वाणी, पदवीधर शिक्षक किसन वराट, उपाध्यापक चंद्रकांत पांडुळे, नागनाथ बुडगे, अर्जुन होले, ईश्वर गवळी, तुळशीराम पवार तसेच पदवीधर म्हणून अध्यापन करणारे व सध्या पदोन्नतीने केंद्रप्रमुख म्हणून सुपा, ता.पारनेर येथे कार्यरत असणारे भगवान समुद्र या सर्व शिक्षकवृंदांवर संपूर्ण पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!