Tuesday, April 14, 2026
Home ताज्या बातम्या मनमिळाऊ शिस्तप्रिय माजी शिक्षक रघुनाथराव ढवळे काळाच्या पडद्याआड

मनमिळाऊ शिस्तप्रिय माजी शिक्षक रघुनाथराव ढवळे काळाच्या पडद्याआड

0
28

जामखेड न्युज—–

मनमिळाऊ शिस्तप्रिय माजी शिक्षक रघुनाथराव ढवळे काळाच्या पडद्याआड

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात ३४ वर्षे सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापन करत इतिहास, भूगोल या विषयाची गोडी निर्माण करणारे शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय,सहकाऱ्यां विषयी आदराची भावना जपणारे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक रघुनाथराव ढवळे यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले.

शिक्षण क्षेत्रातून स्वइच्छा सेवानिवृत्ती स्वीकारल्या नंतर त्यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर भागात किराणा दुकान सुरू केले आणि अल्पावधीतच ढवळे किराणा म्हणून परिसरात दुकान प्रसिद्ध झाले. ते मनमिळाऊ शिस्तप्रिय स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते.

शहरातील तपनेश्वर गल्ली येथील रहिवासी व ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी शिक्षक तसेच ढवळे किराणा ॲण्ड एजन्सीचे मालक रघुनाथराव ढवळे यांचे बुधवारी (दि. १ एप्रिल २०२६ ) दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ढवळे सर यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवले असून, त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.तुषार व द्वारकाधीश यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!