Monday, September 21, 2026
Home ताज्या बातम्या साकत जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा डॉ. भगवानराव...

साकत जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा डॉ. भगवानराव मुरूमकर यांची सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कडे मागणी पत्राची दखल घेत सभापती प्रा. राम शिंदे यांचे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना पत्र

0
77

जामखेड न्युज—–

साकत जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा डॉ. भगवानराव मुरूमकर यांची सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कडे मागणी

पत्राची दखल घेत सभापती प्रा. राम शिंदे यांचे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना पत्र

साकत जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांची विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कडे पत्राद्वारे केली. या पत्राची दखल घेत सभापती प्रा शिंदे यांनी लगेच कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर व उपअभियंता बांधकाम विभाग कर्जत विभाग यांना पत्र देत ताबडतोब कृती कार्यवाही करावी असे पत्राद्वारे मागणी केली आहे.

साकत जिल्हा परिषद गटातील साकत जामखेड रस्ता ते साकत 33 के.व्ही. सबस्टेशन दोन किलोमीटर, साकत ते पिंपळवाडी रस्ता दोन किलोमीटर, साकत जामखेड रस्ता ते गोसाईबाबा देवस्थान पारगाव रस्ता दोन किलोमीटर, शिऊर देवदैठण रस्ता ते बिंडा वस्ती रस्ता 2.5 किलोमीटर, देवदैठण ते भोरे वस्ती रस्ता दोन किलोमीटर अशा प्रकारे गटातील पाच रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर यांची सभापती प्रा राम शिंदे यांच्या कडे केली आहे.

डॉ भगवानराव मुरूमकर यांच्या मागणीची दखल घेत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी लगेच कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अहिल्यानगर व उपअभियंता बांधकाम कर्जत विभाग यांना पत्राद्वारे जामखेड तालुक्यातील वरील नमूद योजनाबाह्य रस्त्यांना ग्रामीण मार्गात दर्जोन्नत करणेबाबत कृती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

सभापती डॉ भगवानराव मुरूमकर यांच्या मागणीमुळे लवकरात लवकर या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळेल व परिसरातील नागरिकांची सोय होईल यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी डॉ मुरूमकर यांचे आभार मानले आहेत.

सभापती भगवान दादा मुरुमकर यांनी पाच रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळण्यात यावा यासाठी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना पत्र दिले होते लगेच प्रा. शिंदे यांनी सभापती भगवान दादा मुरुमकर यांनी प्रस्तावित केलेल्या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा यासाठी संबंधित विभागाला पत्र देऊ सुचिना देण्यात आल्या आहेत त्या बदल्या विधान परिषद सभापती मा श्री राम शिंदे साहेब यांचे मा सभापती भगवान दादा मुरुमकर यांच्या वतीने खुप खुप आभार मानले आहेत.

 

डॉ भगवानराव मुरूमकर यांच्या पाठपुराव्यामुळे वरील रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाला तर परिसरातील नागरिकांसाठी चांगला रस्ता होऊन सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!