जामखेड न्युज – – –
मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी धुव्वा उडवला आहे.आज या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.
ADVERTISEMENT 

इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.