आमदार रोहित पवारांमुळे नवा इतिहास घडणार!!! देशातील सर्वात उंच भगवा ध्वज खर्डा किल्ल्यावर फडकणार

0
300
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर ७४ मीटर उंचीचा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. जगातील सर्वांत उंचीचा हा ध्वज असेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांनी केली. देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी हा ध्वज फिरवला जाईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल, असे पवार यांनी जाहीर केले. हा ध्वज तयार झाला असून त्याचे संत-महंताच्या हस्ते पूजन करण्यात आले.
         लहानपणापासून आपण सगळेच मंदिर व गडकिल्ल्यांना भेट देतो मंदिरं व गडकिल्ल्यांवर भगवं ध्वज फडकताना दिसले की, मोठी प्रेरणा व शक्ती मिळते यातूनच हा ध्वज लावण्याचा निर्णय आमदार रोहित पवारांनी घेतला आहे.
नगर जिल्ह्यातील खर्डा ( शिवपट्टन ) किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. याच किल्ल्याच्या कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. त्यामुळे या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचे प्रतीक म्हणून ७४ मीटरचा जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. देशातील प्रमुख ७४ धार्मिक, आध्यात्मिक व संतपीठांच्या आणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किले व शक्ती पीठांच्या ठिकाणी तसेच आयोध्या, मथुरा, काशी, बोधगया, केदारनाथ, शाहू -फुले आंबेडकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी, महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात आदी ठिकाणी पुजन होणार वे शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात ध्वजाची पूजा होवून  १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत लावला जाईल. या ध्वजाविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ‘हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे. सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती यांचेही प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील,’ असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
  नवी ओळख निर्माण करणार्‍या भगव्या ध्वजाची वैशिष्ट्य 
 तब्बल १८ टन वजन असलेल्य खांबावर ९० किलो वजनाचा आणी ९६/४६ फुट अशा भव्य दिव्य आकाराचा हा भगवा ध्वज आकाशाला गवसणी घालणाऱ्या ७४ मीटर उंचीवर डौलाने फडकत राहील

                              ADVERTISEMENT
 
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here