जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कुठेतरी आळा बसावा, त्यांची फरफट थांबावी, आत्महत्येपासून प्रवृत्त होण्यापासून त्यांना वाचवावे याकरिता ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह समता भुमी, जामखेड जिल्हा अहमदनगर येथे आईचं घर या नूतन वास्तूच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचलित निवारा बालगृह या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील ७० मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून ,या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. लोकवर्गणीतून हे बालगृह चालवले जात आहे.
जामखेड पंचायत समितीच्या सभापती राजश्रीताई मोरे व ह.भ.प कांताताई महाराज सोनटक्के, पत्रकार किशोर आखाडे, यांच्या हस्ते आईचं घर होणाऱ्या प्रकल्पाच्या वास्तूच्या फलकाचे अनावरण झाले.
ADVERTISEMENT

तसेच बालगृहातील विध्यार्थीनी गीता बर्डे व शिवानी शिंदे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी करून संस्थेची माहिती दिली. सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संभाजीराव गायकवाड साहेब,यांनी आपल्या मनोगतात निवारा बालगृह येथे निश्चितच मुलांचे भविष्य उज्वल पणे घडत आहे. त्यांची शैक्षणिक,व कलात्मक प्रगती थक्क करण्याजोगी आहे असे गौरवउद्गार काढले. विद्यार्थ्यांना भारतासहित जागतिक घडामोडींचा मोठा अभ्यास आहे. त्यामुळे बालगृहातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे.भविष्यामध्ये बालगृहातील विद्यार्थी निश्चितच मोठ्यामोठ्या अधिकारी पदावर असतील असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अँड.डॉ. अरुण जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये भविष्यात संस्था आणखी व्यापक पणे तळागाळात जाऊन एक आगळंवेगळं काम करेल अशी ग्वाही दिली तसेच आईचं घर या प्रकल्पामधून एकल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व्यापक प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
सभापती राजेश्री ताई मोरे यांनी बालगृहाच्या कामाची प्रशंसा केली व भविष्यात कुठलीही अडचण आली तरी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिले.
ह.भ.प कांताबाई महाराज सोनटक्के यांनी आपल्या मनोगतामध्ये बालगृहात होणारे व्यापक बदल भविष्यासाठी आश्वासदर्शक आहेत. असे मत व्यक्त केलं.
पत्रकार किशोर आखाडे यांनी आपल्या मनोगतात भविष्यामध्ये संस्थेच्या येणाऱ्या प्रकल्पांना सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
निंबळक जिल्हा अहमदनगर येथील कृष्णा रामभाऊ खेडे , गोरख भानुदास राऊत ,अशोक मुसमाडे यांनी बालगृहातील मुलांना महिनाभर पुरेल एवढे व अन्नधान्य दिले. गोरख भानुदास राऊत यांनी अकराशे रुपयाची देणगी बालगृहाला दिली.
पारिजात इंडस्ट्रीजचे अजिंक्य मेहत्रे, विश्वनाथ काळे ,संदीप कचरे यांनी बालगृहातील मुलांना पांघरण्यासाठी चादरी दिल्या.
ज्योती दीपक ठाकरे यांनी बालगृहातील मुलांना कोरोना पासून बचाव करण्याकरिता मास्क चे वाटप केले.
यावेळी कार्यक्रमाला मोहा गावचे उद्योजक शिवाजी डोंगरे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ ,संस्थेच्या सचिव उमाताई जाधव, वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, लोकाधिकार आंदोलन संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका ताई पवार, सचिन भिंगारदिवे, वैजीनाथ केसकर, विराल पवार, भीमराव चव्हाण, मच्छींद्र जाधव, अजिनाथ शिंदे , संतोष शेगर ,दादा शिंदे, राजू शिंदे, तुकाराम पवार,शंकर सावंत,करण आल्हाट, वैशाली मुरूमकर, नंदकुमार गाडे, संजय तुपे ,संगीता अलंकार, तुकाराम शिंदे, डीसेना पवार, काजोरी पवार, सविता शिंदे, कोमल जाधव, शारदा लोंढे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.