Wednesday, February 4, 2026
Home ताज्या बातम्या आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून जामखेड तालुक्यातील दहा शाळांना E – Pdium...

आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून जामखेड तालुक्यातील दहा शाळांना E – Pdium ( ई पोडियम )

0
2

जामखेड न्युज—–

आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून जामखेड तालुक्यातील दहा शाळांना E – Pdium ( ई पोडियम )

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे एक अभ्यासू आमदार म्हणून अल्पावधीतच आमदार सत्यजित तांबे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील दहा शाळांना
E – Pdium ( ई पोडियम) संचाचे वाटप करण्यात आले. यामुळे शाळांना शैक्षणिक विकासासाठी फायदा होणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात जामखेड तालुक्यातील नऊ शाळांना आपल्या विकास निधीतून ई साहित्य दिले होते पाच शाळांना E – Pdium ( ई पोडियम) तर चार शाळांना संगणक साहित्य देण्यात आले होते. यामुळे या शाळांना निश्चितच शैक्षणिक फायदा होणार आहे.

जामखेड तालुक्यातील श्री साकेश्वर विद्यालय साकत, भैरवनाथ विद्यालय हाळगाव, जामखेड महाविद्यालय जामखेड, अरणेश्वर विद्यालय आरणगाव, केदारेश्वर विद्यालय जातेगाव, प्रदिपकुमार बांगर विद्यालय मोहा, नंदादेवी विद्यालय नान्नज, जिल्हा परिषद शाळा जवळा, कन्या विद्यालय जामखेड, उर्दू हायस्कूल जामखेड अशा दहा शाळांना ई पोडियम संचाचे वाटप करण्यात आले.

ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वरील शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडे साहित्य देण्यात आले. यावेळी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक चे प्राचार्य बी. ए. पारखे, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक चे प्राचार्य सादिक शेख, उप मुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे, जामखेड चे समन्वयक विकास पवार, उकिर्डे सर, प्रदिपकुमार बांगर माध्यमिक व उच्च माध्यमिक चे प्राचार्य आप्पासाहेब शिरसाठ, सुदाम वराट, सचिन वराट, हजारे सर, वटाणे सरांसह अनेक मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

मार्च 2025 मध्ये जिजामाता विद्यालय घोडेगाव, नागेश विद्यालय, न्यु इंग्लिश स्कूल खर्डा, संत नंदराम महाराज विद्यालय धामणगाव या पाच शाळांना अत्याधुनिक E – Pdium ( ई पोडियम) देण्यात आले होते. तसेच आणखेरी देवी विद्यालय फक्राबाद, चन्नप्पा विद्यालय पिंपळगाव उंडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फक्राबाद, हनुमान माध्यमिक विद्यालय दिघोळ या चार शाळांना संगणक देण्यात आले होते. फेब्रुवारी 2024 मध्येही जामखेड तालुक्यातील सात शाळांना संगणक देण्यात आले होते.

अत्याधुनिक E – Pdium ( ई पोडियम) ची किंमत बाजारात दोन लाखांपेक्षा जास्त आहे. असे पाच संच देण्यात आले आहेत. यामुळे शाळांचा निश्चितच शैक्षणिक फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!