Monday, February 2, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
3

जामखेड न्युज—–

जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जामखेड महाविद्यालयाची गुणी खेळाडू सानिका संतोष घोडके ची निवड करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय निमगाव ता मालेगाव जि नाशिक येथे झालेल्या विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची कु. सानिका संतोष घोडके हिने झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे.

9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 रोजी आण्णा विद्यापीठ चेन्नई, चेन्नई तामिळनाडू येथे होणाऱ्या बॉल बॅडमिंटन या स्पर्धेला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (All India Inter University ) या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री उद्धव बापू देशमुख,उपाध्यक्ष श्री दिलीपशेठ गुगळे,सचिव श्री अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री शरदकाका देशमुख,मा शशिकांत देशमुख,मा. राजेशजी मोरे
सह सर्व संचालक मंडळ

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ.सुनिल जी. पुराणे, उपप्राचार्य सुनिल.वाय. नरके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आण्णा मोहिते, व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!